Kharif MSP : खरीप हंगामाच्या हमीभावातून निराशाच

MSP Announced For Kharif 2023 : आगामी खरीप हंगामातील पिकांच्या किमान हमी किमतीत (एमएसपी) वाढ करण्यात आली आहे.
MSP
MSPAgrowon

Yavatmal News : आगामी खरीप हंगामातील पिकांच्या किमान हमी किमतीत (एमएसपी) वाढ करण्यात आली आहे. कापूस ५४० रुपये, सोयाबीन ३०० रुपये तर, तूर ४०० रुपये प्रतिकिंटलप्रमाणे हमीभाव जाहीर करण्यात आले. मोठा गाजावाजा करून हमीभाव जाहीर करण्यात आले असले, तरी शेतकरी वर्गातून नाराजीचा सूर उमटत आहे.

पिकांच्या उत्पादन खर्चावर किमान पन्नास टक्के नफा देऊन हमीभाव निश्‍चित करण्यात आल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. प्रत्यक्षात केंद्र सरकारचा दावा शेतकऱ्यांच्या पचनी पडला नाही. गेल्या काही वर्षांपासून शेतकरी सातत्याने नापिकीला सामोरे जात आहे.

MSP
Kharif MSP : हमीभावाचे भीषण वास्तव

गेल्या वर्षी अतिवृष्टीचा शेतकऱ्यांना फटका सहन करावा लागला. कापूस व सोयाबीन पिकाला समाधानकारक भाव न मिळाल्याने आतापर्यंत शेतकऱ्यांनी शेतीमाल घरातच ठेवला. भाववाढीचे कोणतेही चिन्ह दिसत नसल्याने अखेर खरीप हंगामाच्या तोंडावर शेतीमाल विक्रीला काढण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली.

MSP
Chana MSP : हमीभावातील हरभरा खरेदीचे उरले केवळ दोन दिवस

बियाणे, खते, डिझेल, मजुरी, वाहतुकीच्या दरात वाढ झाली आहे. शेतीवर होणारा लागवड खर्च व त्यातून येणारे उत्पन्न याचा कोणताही ताळमेळ बसत नसल्याची ओरड शेतकऱ्यांतून होत आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेला हमीभाव शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

केंद्र सरकारने शेतीवर होणारा लागवड खर्च गृहीत धरायला पाहिजे होता. परंतु तसे करण्यात आले नाही. गेल्या वर्षी भाव न मिळाल्याने कापूस अजूनही शेतकऱ्यांच्या घरातच आहे. लागवड खर्चही निघत नाही, अशी एकूणच परिस्थिती आहे. बियाणे, खते, डिझेल, मजुरीच्या दरात वाढ झाली आहे. जाहीर झालेले हमीभाव शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे.
कृषिमूल्य आयोगाने जे दर जाहीर केले. त्यामध्ये शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही. २०२२पर्यंत दुप्पट उत्पन्न करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली होती. ते न करता तेल आयात करण्यासाठी आयात कर कमी केले. त्यामुळे ९० रुपये तेलाचे भाव पडले. सोयाबीन व कापूस दर कमी झाले. तूर आयात धोरण राबविल्यामुळे तुरीचे भाव पडत आहे. शासकीय कर्मचारी, उद्योगपतींचे हित जोपासले जात असताना शेतकऱ्यांना काहीच मिळताना दिसत नाही.
- अशोक भुतडा, शेतकरी, यवतमाळ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com