Digital Soil Mapping : मराठवाड्यातील शिवाराचे डिजिटल मृदा नकाशे होणार तयार

रिमोट सेन्सिंग, भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस), उपग्रह या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून मराठवाड्यातील सर्वेक्षणच्‍या माध्‍यमातून डिजिटल मृदा नकाशे तयार करण्‍यात येणार आहेत.
VNMKV, Parbhani
VNMKV, ParbhaniAgrowon

Digital Soil Mapping परभणी ‌: भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) (आयसीएआर) अंतर्गत नागपूर येथील राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व भूमी उपयोग नियोजन संस्था आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (VNMKV Parbhani) यांच्यात गुरुवारी (ता. १६) सामंजस्य करार करण्यात आला.

रिमोट सेन्सिंग, भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस), उपग्रह या आधुनिक तंत्रज्ञानाचा (Modern Technology) उपयोग करून मराठवाड्यातील सर्वेक्षणच्‍या माध्‍यमातून डिजिटल मृदा नकाशे (Digital Soil Mapping) तयार करण्‍यात येणार आहेत.

या करारावर कुलगुरू डॉ. इंद्र मणी, राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व भूमी उपयोग नियोजन संस्थेचे संचालक डॉ. बी. पी. भास्कर, संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर आणि मृद्‍ विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. प्रवीण वैद्य यांनी स्‍वाक्षरी केल्‍या.

VNMKV, Parbhani
Soil Science : मृदा विज्ञानासमोरील वाढती आव्हाने

या वेळी विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य आमदार सतीश चव्‍हाण, आमदार रमेश कराड, आमदार अभिमन्यू पवार, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले आदींची उपस्थिती होती.

VNMKV, Parbhani
Soil Testing : या कारणांमुळे माती परिक्षण अहवाल येतो चुकीचा

सामंजस्य कराराचे महत्त्व...

शाश्‍वत शेतीकरिता मातीचा कार्यक्षम वापर करणे आवश्‍यक आहे. रिमोट सेन्सिंग, भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस), उपग्रह या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून संपूर्ण मराठवाडा विभागातील सर्वेक्षणच्‍या माध्‍यमातून डिजिटल मृदा नकाशे तयार करण्‍यात येणार आहेत.

त्‍याआधारे संशोधनद्वारे निर्णय समर्थन प्रणाली विकसित करण्‍यात येईल. याचा शेतकऱ्यांना मातीच्‍या गुणधर्मानुसार योग्‍य पिकांची लागवड निवड आणि जमीन वापराचे काटेकोर नियोजन करण्‍यास उपयुक्‍त ठरेल.

मृदा स्‍थळ उपयुक्तता, मातीची सुपीकता, स्‍थळनिहाय विशिष्ट माती आणि अन्नद्रव्‍य व्यवस्थापनासाठी ही प्रणाली मार्गदर्शक ठरेल.

दोन्‍ही संस्‍थेतील वैज्ञानिक यांचे ज्ञान, माहिती आणि कौशल्‍य यांची देवाणघेवाण करण्‍यात येऊन पदव्‍युत्तर विद्यार्थ्‍यांच्‍या मृदा संशोधनासही हातभार लाभेल.

या करारामध्ये पदव्युत्तर पदवी, आचार्य पदवीच्या विद्यार्थ्‍यांच्या संशोधनासाठी व संशोधन लेखांची गुणवत्ता वाढविण्याकरिता संधी प्राप्त होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com