Pandharpur Yatra : चैत्री एकादशीसाठी अवघी पंढरी भक्तीने भारली

चैत्र शुद्ध (कामदा) एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्यासह परराज्यांतूनही वारकऱ्यांची रविवारी (ता. २) पंढरपुरात मांदियाळी जमली.
Pandharpur
Pandharpur Agrowon
Published on: 
Updated on: 

Solapur News पंढरपूर : चैत्र शुद्ध (कामदा) एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या (Vithhal rukmini Darshan) दर्शनासाठी राज्यासह परराज्यांतूनही वारकऱ्यांची रविवारी (ता. २) पंढरपुरात मांदियाळी जमली. चंद्रभागा तीरासह नगरप्रदक्षिणा मार्ग आणि मंदिर परिसरासह सर्वत्र टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषाने अवघी पंढरी भक्तीने भारून गेली.

मंदिर समितीच्या वतीने श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेची पहाटे नित्यपूजा झाली. श्री विठ्ठलाची नित्यपूजा मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्‍वर महाराज जळगावकर यांनी कुटुंबीयांसमवेत, तर रुक्मिणी मातेची नित्यपूजा मंदिर समितीचे सदस्या ॲड. माधवी निगडे यांनी कुटुंबीयांसमवेत केली.

Pandharpur
Pandharpur Yatra : पंढरपुरात आज रंगणार चैत्री यात्रेचा सोहळा

या एकादशीनिमित्त मंदिराच्या गाभाऱ्यात विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील दर्शनाची रांग आजही गोपाळपूर रस्त्यावरील पत्राशेडपर्यंत पोहोचली.

चैत्री एकादशीला वारकऱ्यांना सुलभ दर्शन व्हावे, यासाठी मंदिर समितीच्या वतीने आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या. दर्शनरांगेतील वारकऱ्यांना मोफत खिचडी आणि ताक देण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com