Radhakrushna Vikhe Patil
Radhakrushna Vikhe PatilAgrowon

वारकरी, स्थानिकांना केंद्रबिंदू ठेवून विकास आराखडा

पंढरपूर तीथक्षेत्र विकास आराखड्यासंदर्भात शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथे स्थानिक नागरिक, व्यापारी तसेच वारकऱ्यांशी चर्चा करण्यात आली. या वेळी ते बोलत होते.
Published on

पंढरपूर, जि. सोलापूर : ‘‘श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी (Vithhal Rukmini Tempel) पंढरपूरला दररोज मोठ्या प्रमाणात वारकरी येतात. त्यांना पायाभूत सुविधा मिळाव्यात, यासाठी वारकरी, भाविकांना व स्थानिक नागरिकांना केंद्रबिंदू मानून पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची रचना करण्यात आली आहे,’’ अशी ग्वाही पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrushn Vikhe Patil) यांनी दिली.

Radhakrushna Vikhe Patil
सरकारच्या अनास्थेने सामान्यांचे आरोग्य धोक्यात ः राधाकृष्ण विखे

पंढरपूर तीथक्षेत्र विकास आराखड्यासंदर्भात शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथे स्थानिक नागरिक, व्यापारी तसेच वारकऱ्यांशी चर्चा करण्यात आली. या वेळी ते बोलत होते. विखे-पाटील म्हणाले, ‘‘तीर्थक्षेत्र विकासाचा प्रारूप आराखडा भविष्यात होणारी गर्दी व वाहतूक व्यवस्था विचारात घेऊन केला आहे.

Radhakrushna Vikhe Patil
माझा जीव, माझी जबाबदारी : राधाकृष्ण विखे

आराखड्यांतर्गत करण्यात येणारी कामे ही स्थानिक नागरिक व वारकरी, भाविकांच्या निदर्शनास आणून व विश्‍वासात घेऊनच करण्यात येतील. शहरात एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये, यासाठी शहरालगतच्या परिसराचाही विकास करू. वारकऱ्यांच्या परंपरेला धक्का न पोहोचता विकासकामे होतील. शिर्डीच्या धर्तीवर सौंदर्यीकरण करण्याबाबत विचार करू.’’

‘स्थानिकांनीही द्यावा आराखडा’

‘‘स्थानिक व्यापारी, नागरिक वा वारकरी यांनी त्यांच्याकडील विकास आराखडा १५ दिवसांत प्रशासनाकडे सादर करावा. प्रशासनाने तयार केलेला आराखडा आणि स्थानिक नागरिकांनी केलेला आराखड्याबाबत एकत्रित विचार करून या बाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. कॉरिडॉरबाबत व्यापारी व नागरिकांनी भीती बाळगू नये,’’ असे विखे-पाटील यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com