

Maharashtra Agriculture Department : राज्य कृषी विभागाकडून शेतकरी, शेती आणि पिकांच्या माहितीसाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवते. दरम्यान पिके, शेती आणि शेतकऱ्यांविषयी एकत्रीत माहिती मिळण्यासाठी कृषी विभागाकडून एका अॅपची निर्मीती करण्याचे काम सुरू आहे.
'अॅग्री स्टॉग' अॅप लवकरच उपलब्ध होणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांची निवड करून त्यांची माहिती या अॅपमध्ये उपलब्ध करून देण्याचे काम सुरू केले आहे.
भूमी अभिलेख विभागाच्या ई फेरफार प्रकल्पाच्या राज्य समन्वयक सरिता नरके यांनी याबाबत माहिती दिली, ई पीक पाहणी अॅपच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती घेण्यात आली आहे.
याचबरोबर कृषी विभागाकडे देखील शेती आणि शेतकऱ्यांची विविध स्तरातून उपलब्ध करण्यात आली आहे. या दोन्ही विभागाचा डेटा एकमेकांना लिंक करण्यात येणार आहे.
जमिनींचा मालकापासून ते त्यांच्या ताब्यात असलेले क्षेत्र, त्यावर घेण्यात येणारी पिके, त्यांना लागणारी बियाणे, माती परिक्षणाचा अहवाल, केंद्र आणि राज्य सरकारच्या शेती संदर्भातील असलेल्या योजना आणि अनुदानांची यांची माहिती, लाभार्थी यांची माहिती एकाच ठिकाणी मिळणार असल्याची माहिती नरके यांनी दिली.
त्यामुळे कोणत्या भागात कोणती पिके घेतली जातात, तेथील शेतकऱ्यांना कोणच्या बियाणांची गरज आहे, ते कुठे उपलब्ध आहेत, त्या दुकानांची यादी, कोणत्या भागातील शेतीमध्ये कशाचे प्रमाण कमी आहे, ते भरून काढण्यासाठी काय करावे लागणार आहे, यांची सर्व माहिती शेतकऱ्यांबरोबरच राज्य सरकारकडेही एकाच ठिकाणी मिळणार आहे.
त्याबरोबरच बाजारावर नियंत्रण ठेवणे देखील शक्य होणार आहे. पिकांचे योग्य नियोजन झाले, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. तसेच केंद्र आणि राज्य सरकारला कोणत्या योजना कोणत्या भागात राबविल्या पाहिजेत.
त्याचा लाभ थेट शेतकऱ्यांना कसा देता येईल, तसे धोरण राबविणे सोपे होणार आहे. हा सर्व डेटा आधार क्रमांकाशी जोडला असल्यामुळे सरकारी अनुदान वाटपातील गैरप्रकारही थांबण्यास मदत होणार असल्याचे नरके म्हणाल्या.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.