Agri Business Management
Agri Business ManagementAgrowon

Agri Business Management : ‘ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट’अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू

Agriculture Education : कृषी क्षेत्रात विविध व्यवसाय करण्याला, चांगली नोकरी मिळवायला मुबलक संधी उपलब्ध आहेत. परंतु असे कोणते व्यवसाय आहेत, ते कसे सुरू करायचे (स्टार्ट अप), त्यासाठी काय कौशल्य (स्किल्स), ज्ञान (नॉलेज) आवश्यक असते.
Published on

Pune News : कृषी क्षेत्रात विविध व्यवसाय करण्याला, चांगली नोकरी मिळवायला मुबलक संधी उपलब्ध आहेत. परंतु असे कोणते व्यवसाय आहेत, ते कसे सुरू करायचे (स्टार्ट अप), त्यासाठी काय कौशल्य (स्किल्स), ज्ञान (नॉलेज) आवश्यक असते. नोकरीच्या कोणत्या संधी कुठे उपलब्ध आहेत, त्यासाठी स्वतःला कसे अपग्रेड केले पाहिजे आदी प्रश्न भेडसावणाऱ्या पदवीधारक (२१ ते २५ वयोगटातील) तरूणांसाठी ‘ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट हा एक वर्षाचा खास ‘पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम’ उत्तम पर्याय आहे.

‘सकाळ-ॲग्रोवन संलग्न शैक्षणिक संस्था ‘एसआयआयएलसी’तर्फे हा अभ्यासक्रम पुण्यात चालविला जातो. या अभ्यासक्रमाच्या १० व्या बॅचसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

या अभ्यासक्रमाचे वैशिष्ठ्य म्हणजे नामांकित ॲग्री इंडस्ट्रींनी या अभ्यासक्रमाची रचना केलेली आहे. तसेच सध्यस्थितीत मार्केटची गरज ओळखून त्यानुसार अभ्यासक्रमात बदल केला जातो.

Agri Business Management
Agriculture, Education Guidance : आरोग्य, शिक्षण, कृषी विषयावर नंदुरबार येथील परिषदेत मार्गदर्शन

यात विद्यार्थ्यांना इंडस्ट्री कशी चालवतात, त्यातील अडचणींवर मात कशी करावी, स्पर्धेत कसे टिकावे, मनुष्यबळ कसे हाताळावे, ‘सप्लाय चेन’चे व्यवस्थापन, आर्टीफिशीअल इंटीलिजन्स, डेटा ऍनॅलिटीक्स, डिजिटल मार्केटिंग, यशस्वी उद्योजक कसे बनावे, आऊट ऑफ बॉक्स जाऊन डिझाईन थिंकिंग कसे करावे, स्वतःमध्ये उद्योजकता कौशल्य कसे विकसित करावीत, नोकरीत वरच्या पदावर जाण्यासाठी कसा दृष्टीकोन हवा, व्यवसाय कसा वाढवावा, अन्नप्रक्रिया, दुग्धव्यवसाय, निर्यात व्यवसायातील संधी आदी विषयांचा समावेश आहे.

या अभ्यासक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना अशी शिकवण दिली जाते की, विद्यार्थी ६ महिने इंडस्ट्रीत इंटर्नशीप करण्यासाठी गेल्यावर त्यांनी कंपनीसाठी आपल्या शिक्षणाद्वारे मोलाचे योगदान द्यावे. ज्यामुळे कंपनीला देखील फायदा होईल आणि विद्यार्थ्यांनाही आपला चांगला परफॉर्ममन्स दिल्यामुळे त्याच कंपनीत नोकरी मिळविण्यासाठी मदत होईल. या संकल्पनेमुळे विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाद्वारे चांगल्या प्लेसमेंटस मिळण्याचे रेकॉर्ड आहे.

Agri Business Management
Agriculture Education Research : कृषी शिक्षण संशोधनातील पुनर्विलोकन समितीला मुदतवाढ

हुशार विद्यार्थ्यांना विशेष स्कॉलरशीप देखील देण्याचे प्रयोजन अभ्यासक्रमात आहे. या अभ्यासक्रमाबाबत सविस्तर जाणून घ्यायचे असेल तर लगेच दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा. आपल्या करिअरला दिशा देण्यासाठी हा अभ्यासक्रम निश्चितच फायदेशीर आहे. प्रवेश मर्यादित जागांसाठी असल्याने आजच संपर्क साधा. अभ्यासक्रम व प्रवेशासाठी संपर्क ः ९८८१०९९७५७

अभ्यासक्रमाविषयी थोडक्यात...

अभ्यासक्रमाचे नाव ः पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम इन ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट

कालावधी ः १ वर्ष पूर्णवेळ

ठिकाण ः ‘सकाळ व ॲग्रोवन’संलग्न शैक्षणिक संस्था, एसआयआयएलसी, सकाळनगर, बाणेर रोड, पुणे.

प्रवेश कुणासाठी ः कोणत्याही क्षेत्रातील पदवीधर (बीएस्सी ॲग्री व संलग्न शाखा, बीए, बीकॉम, बीबीए, बीई, बीसीएस आदी)

वयोमर्यादा ः फक्त २१ ते २५ वयोगटातील विद्यार्थी

अधिक माहितीसाठी संकेतस्थळ ः www.siilc.edu.in

अभ्यासक्रम व प्रवेशासाठी संपर्क ः ९८८१०९९७५७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com