Crop Insurance
Crop InsuranceAgrowon

पीक नुकसानीची पंचनामे कार्यपद्धती निश्‍चित करा

कृषी सहायक संघटनेच्या माहितीनुसार, राज्यात दरवर्षी अतिवृष्टी, पूर, अवेळी पाऊस, गारपीट इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान होते.

औरंगाबाद : नैसर्गिक आपत्तीमुळे (Natural Calamity) पिकांच्या नुकसानीच्या (Crop Damage) क्षेत्राचे पंचनामे (Crop Survey) करण्याची कार्यपद्धती निश्‍चित करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेने केली आहे. तसे पत्र मंगळवारी (ता.२१) राज्याच्या कृषी आयुक्तांना पाठविण्यात आले आहे.

कृषी सहायक संघटनेच्या माहितीनुसार, राज्यात दरवर्षी अतिवृष्टी, पूर, अवेळी पाऊस, गारपीट इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान होते. त्याबाबत शासनाने वेळोवेळी घेतलेल्या निर्णयानुसार, शेतकऱ्यांना ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसानीच्या क्षेत्रासाठी मदत देण्यात येते. या नुकसानीच्या क्षेत्राचे सर्वेक्षण व पंचनामे, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांच्या पथकांकडून करण्यात येतात. परंतु १९७९, १९८२ व १९८३ मधील शासन निर्णयामध्ये तलाठी व ग्रामसेवक यांनी हे काम करावे, असे निर्देश आहेत. कृषी सहायकांचा संबंधित शासन निर्णयामध्ये कुठेही उल्लेख नाही.

नुकसानीच्या क्षेत्राचे सर्वेक्षण व पंचनामे तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक या त्रिस्तरीय पथकाकडून कधीपासून सुरू झाले? या पथकात कृषी सहायकांचा समावेश कधी केला गेला, कृषी सहायकांनी या पथकासोबत हजर राहून काय काम करावे, या बाबतच्या मार्गदर्शक सूचना नाहीत. सर्वेक्षण व पंचनामे झाल्यानंतर त्यांचे संकलन करून अहवाल सादर करण्याची जबाबदारी तलाठ्यांवर देण्यात आलेली असतानाही कृषी विभागाला तक्रारींना सामोरे जावे लागत आहे. या बाबतचा संभ्रम दूर करण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन होण्याची अपेक्षाही संघटनेने व्यक्त केली आहे.

विनाकारण कृषी विभागावर रोष

सर्वेक्षण व पंचनामे करणे, अहवाल देणे व मदत वाटप करणे ही महसूल विभागाची जबाबदारी आहे. काही जिल्ह्यांत तहसीलदारांकडून कृषी सहायकांवर माहितीचे संकलन करण्याबाबत दबाव टाकला जातो. हे सर्व शासन निर्णयाचे उल्लंघन आहे. या कामाच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर कृषी विभागाकडे बोट दाखवून मोकळे होतात. त्यामुळे विनाकारण कृषी विभागाला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागते, असेही संघटनेने म्हटले आहे.

हे करता येऊ शकते...

- शासन निर्णयाप्रमाणे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून काम सोपे

- तंत्रज्ञानाचा वापर सर्वेक्षण व पंचनामे करण्यासाठी करता येईल

- नैसर्गिक आपत्तीमध्ये शेती, पिकांचे पंचनामे करण्यासंबंधी, पिकांचे नुकसान ठरविण्याची कार्यपद्धती कृषी आयुक्तालय स्तरावरून तयार करावी.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com