Jalgaon News : बागायतदार आहे, बागायदारीण पाहिजे!

Latest Agriculture News अलीकडच्या काळात नोकरी नसेल तर छोकरी मिळत नाही, असे चित्र आहे. सधन शेतकरी असला तरी त्यास कोणी मुलगी द्यायला तयार होत नाही.
Farmers Son Marriage Issue
Farmers Son Marriage Issue Agrowon

Farmers Son Marriage Issue : अलीकडच्या काळात नोकरी नसेल तर छोकरी मिळत नाही, असे चित्र आहे. सधन शेतकरी असला तरी त्यास कोणी मुलगी द्यायला तयार होत नाही.

त्यामुळे अनेक सधन शेतकऱ्यांची मुले, शेती काम करणारे तरुण लग्नाविना असल्याचे व त्यातून कौटुंबिक मनस्ताप व कलह वाढीस लागत असल्याचे आपण पाहतो, अथवा ऐकतो.

विवाहासाठी मुलाची निवड करताना त्यास नोकरी असावी, तो एकटाच असावा, आई, वडील व कुटुंबीयांपासून दूर नोकरीस असावा यासोबतच त्यास शेती असावी, अशा अपेक्षा असतात.

जर शेतकरी मुलगा लग्नासाठी चालत नाही तर मग मुलाकडे शेती असावी, अशी अपेक्षा का ठेवली जाते? हा यक्षप्रश्न असल्याचा सूरही व्यक्त होतो. परंतु समाज मनात वाढीस लागत असलेल्या या मनोवृत्तीमुळे सधन शेतकरी अथवा बागायतदारांची मुले व स्वतः शेतीची कामे करणाऱ्या उपवर तरुणांचे विवाह होत नाहीत.

Farmers Son Marriage Issue
Farmer Wedding : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुला-मुलींचा शाही विवाह, लग्नाचा थाट पाहाच

या गंभीर प्रकाराकडे लक्ष वेधण्यासाठी नाचणखेडा (ता. पाचोरा) येथील उपवर बागायतदाराने नवरदेवाचा पेहराव करत, कपाळावर मुंडावळ्या (बाशिंग) बांधून पाचोरा येथे केलेले अनोखे आंदोलन शहरवासीयांचे लक्ष वेधणारे ठरले आहे. या आंदोलनाची चर्चा शहरात चांगलीच रंगली आहे.

Farmers Son Marriage Issue
Farmer Wedding : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुला-मुलींचा शाही विवाह, लग्नाचा थाट पाहाच

नाचणखेडा येथील पंकज राजेंद्र महाले हा उपवर बागायतदार शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या, वर्दळीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात येऊन डोक्यावर टोपी, पांढरा गणवेश व कपाळी मुंडावळ्या बांधत आला व त्याने ‘बागायतदार आहे बागायतदारीण हवी’ असा फलक हातात घेऊन उंचावत अनोखे आंदोलन केले.

हा बागायतदार तरुण १० एकर बागायती शेतीचा मालक व पदवीधर असला तरी तो खेडेगावात वास्तव्यास आहे व त्याला नोकरी नाही म्हणून लग्नासाठी कोणी मुलगी मिळत नसल्याने त्याने अनोखे व लक्षवेधी आंदोलन केले.

आंदोलनाने सारेच विचारमग्न...

नवरदेवाच्या पेहरावत हातात फलक उंचावत बागायतदार तरुणाने केलेले हे अनोखे आंदोलन पाहून शहरवासीय प्रथम अचंबित झाले, परंतु या उपवर बागायतदाराच्या आंदोलनामागची भूमिका कळाल्यानंतर मात्र उपस्थित सारे भाऊकही झाले.

समाजात असलेले वास्तव या बागायतदार तरुणाने आंदोलनाच्या माध्यमातून लोकांसमोर मांडण्याचा केलेला प्रयत्न खरोखरच साऱ्यांनाच विचारमग्न करणारा ठरला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com