Team Agrowon
भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांचे चिरंजीव चिरंजीव अॅड. परिक्षित पवार व डॉ. चैताली मोहिते-पाटील यांचा औसा येथे शाही विवाह केला.
यावेळी आपल्या मुलाच्या विवाहाबरोबर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील २५ जोडप्यांचा भव्यदिव्य विवाह सोहळा घडवून आणला.
सामुदायिक विवाह सोहळ्यात अभिमन्यू पवार यांनी २५ मुलींचे कन्यादान केले. आहेर केले, संसार उपयोगी वस्तू दिल्या.
आपल्या मुलाला जे कपडे तेच कपडे सामुदायिक विवाह सोहळ्यातील २५ वरांना, यासह सर्व गोष्टी सारख्या ठेवण्यात आल्या होत्या
परंपरांना फाटा देत स्वत:च्या आनंदात इतरांना सुद्धा सहभागी करुन घेण्याचा या सोहोळ्याला हजारो लोकांनी नवपरिणितांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.
या विवाह सोहळ्यासाठी औसा येथील उटगे मैदानावर मंडप बांधण्यात आला होता. मतदारसंघातील सर्वांना या विवाहाचं निमंत्रण देण्यात आलं आणि जवळपास पन्नास हजार लोकांना पंगत देण्यात आली
आमदार अभिमन्यू पवार यांच्या संकल्पनेतून क्रिएटिव्ह फाउंडेशनने औसा येथील उटगे मैदानावर सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.