Red Chili Production : यंदाही बहरली लालभडक गावरान लालमिरची

लालभडक रंग आणि लज्जतदार चवीसाठी प्रसिद्ध असलेली गावरान मिरची नायगाव तालुक्यातील बरबडा परिसरात बहरली आहे.
Red Chili Production
Red Chili ProductionAgrowon

Red Chili market Update नांदेड : लालभडक रंग आणि लज्जतदार चवीसाठी प्रसिद्ध असलेली गावरान मिरची (Desi Red Chili) नायगाव तालुक्यातील बरबडा परिसरात बहरली (Red Chili Production) आहे. या परिसरातील शेतकरी रब्बी हंगामात मिरचीचे (Rabi Chili Production) पीक मोठ्या प्रमाणात घेतात.

या मिरचीला महाराष्ट्रासह परराज्यातून मागणी असते. सध्या मिरचीची तोडणी सुरू झाली आहे. खरेदीसाठी मुंबई, कर्नाटक, आंध्र प्रदेशातून व्यापारी येथे दाखल होत असल्याची माहिती उत्पादक शेतकऱ्‍यांनी दिली.

Red Chili Production
Chili Intercrop : मिरचीत मेथीचे आंतरपीक

लांबलचक, लालभडक, चवीला अतिशय तिखट, अशी बरबड्याच्या मिरचीची ओळख आहे. सुपीक कोरडवाहू जमिनीत या गावरान मिरचीचे उत्पादन चांगले मिळते. बरबडा परिसरातील जमीन मिरचीसाठी पोषक असल्याने येथील बहुतांश शेतकरी मिरचीचे उत्पादन घेतात. यासाठी खरिपात मूग, उडीद अशी अल्पमुदतीची पिके घेऊन ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात मिरचीची लागवड करतात.

Red Chili Production
Green Chili Season : हिरव्या मिरचीचा हंगाम गुंडाळल्यात जमा

योग्य ती निगा राखल्यानंतर नोव्हेंबरपासून मिरची परिपक्व होण्यास सुरुवात होते. यानंतर जानेवारीमध्ये या लाल मिरचीची तोडणी सुरू होते. मागील वर्षापासून मिरचीचे उत्पादन बरे येत आहे. तसेच भावही उच्चांकी मिळत असल्याने शेतकरी या पिकाकडे वळले आहेत.

दरम्यान, शेतकऱ्यांना मजुरांची समस्या भेडसावत आहे. त्यातच मजुरीही वाढली आहे. त्यामुळे मिरचीचा उत्पादन खर्च वाढला आहे. मात्र, त्याप्रमाणात उत्पन्न मिळेलच याची शाश्वती राहिली नाही. निसर्गाच्या लहरीपणाचा फटकाही बसतो आहे.

मिरचीची लागवड, आंतरमशागत व तोडणी मजुरांकडून होते. त्यासाठी आजूबाजूच्या गावांतील महिला बरबडा येथे येतात. मजुरीएवजी तोडलेल्या मिरचीपैकी काही मिरची त्यांना दिली जाते. त्यामुळे या मजुरांना घरी वर्षभर लागणाऱ्या मिरचीचा प्रश्न सुटतो. शिल्लक मिरची विकून पैसेही मिळतात. सध्या मिरचीची तोडणीसाठी मजूर महिला दाखल झाल्या आहेत.

- लक्ष्मण पाटील, शेतकरी, बरबडा.

मिरची खरेदीसाठी अनेक व्यापारी बांधावर येत आहेत. ओल्या मिरचीला १५०, तर वाळल्यावर ३०० रुपये दर मिळतो आहे.

- शिवाजी कोपलवाड, मिरची उत्पादक शेतकरी, बरबडा.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com