Onion Subsidy : कांद्याला सरसकट अनुदान देण्याची मागणी

यंदा रब्बी व उन्हाळी हंगामातील कांदा लागवड वाढीच्या अवस्थेत आहे. त्यातच अवकाळी पाऊस, वातावरणातील बदल, खत, औषधांचा खर्च मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला असून बाजारभाव पडलेले आहेत.
Onion Market
Onion MarketAgrowon
Published on
Updated on

Onion Market Update यंदा रब्बी व उन्हाळी हंगामातील कांदा लागवड (Onion Cultivation) वाढीच्या अवस्थेत आहे. त्यातच अवकाळी पाऊस, वातावरणातील बदल, खत, औषधांचा खर्च मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला असून बाजारभाव (Onion Rate) पडलेले आहेत.

सध्या कांदा अनुदान नोंदणीसाठी मुदतवाढ दिली असली तरी उत्पादित कांदा मे नंतर बाजारात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ऑगस्ट २०२३ पर्यंत विक्री केलेल्या कांद्याला अनुदान मिळावे, अशी मागणी आंबेगाव तालुका किसान काँग्रेसचे सरचिटणीस बाळासाहेब इंदोरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Onion Market
Onion Market : कांदा विक्रीसाठी शेतकऱ्यांची गर्दी

राज्य शासनाने ३१ मार्चपर्यंत विक्री केलेल्या कांद्यालाच अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला २० एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. वाढलेले खतांचे दर, पाऊस यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीमध्ये आला असून, प्रत्येक कांदा उत्पादक शेतकऱ्याला अनुदान मिळायला हवे. खऱ्या अर्थाने एप्रिल महिन्यामध्ये जास्तीत जास्त कांदा काढणी होत असते.

Onion Market
Onion Market : कांद्याला प्रतिकिलोस २५ पैशांची बोली

हा काढलेला कांदा शेतकरी लगेच बाजारात नेत नाही. बाजारभाव मिळण्याच्या आशेने शेतकरी कांदा साठवून ठेवतात.

बाजारभाव वाढेल या आशेवर थांबतो, भाव वाढेल याची शक्यता नसते. त्यामुळे अनुदानापासून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही याची शासनाने दक्षता घ्यावी.

तुम्ही दिलेले अनुदान हे तात्पुरत्या कालावधीसाठी न देता २०२३ मधील कांदा उत्पादकांना सरसकट द्यावे, असेही बाळासाहेब इंदोरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

शेतकरी मुख्यमंत्र्यांना भेटणार

आंबेगाव तालुक्यातील काही तज्ज्ञ शेतकऱ्यांना घेऊन कांदा उत्पादन निर्यात व अनुदान या प्रश्नासंबंधी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार असल्याची माहिती आंबेगाव तालुका किसान काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष ॲड. राजेंद्र वेडे पाटील यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com