PDKV Convocation : विद्यार्थ्यांना ४३२७ पदव्यांचे होणार वितरण ः डॉ. गडाख

विद्यापीठाचे सध्या २६ वे मानांकन असून, पहिल्या दहामध्ये समावेश होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सेंद्रिय शेती प्रमाणीकरणाचा पदवी अभ्यासक्रम पहिल्यांदा येथे सुरु झाला.
Dr. Sharad Gadakh
Dr. Sharad GadakhAgrowon
Published on
Updated on

PDKV Convocation News अकोला ः ‘‘डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा (PDKV) ३७ वा दीक्षान्त समारंभ (PDKV Convocation) आज (ता. ५) राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी (Bhagatsingh Koshyari) यांच्या अध्यक्षतेत होत आहे.

या वर्षी नागपूरच्या कृषी महाविद्यालयाची एमएस्सीची विद्यार्थिनी सोम्या शेफालिका दाश हिने सर्वाधिक ७ सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. या सोहळ्यात ४३२७ पदव्यांचे वितरण केले जाईल,’’ अशी माहिती कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी दिली.

दीक्षान्त सोहळ्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. व्ही. के. खर्चे, कृषी अधिष्ठाता डॉ. श्‍यामसुंदर माने, शिक्षण विस्तार संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे, अधिष्ठाता डॉ. सुधीर वडतकर, कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे उपस्थित होते.

Dr. Sharad Gadakh
PDKV : यंदाच्या ‘जॉईंट अॅग्रेस्को’त ‘पंदेकृवि’च्या ६३ शिफारशी

डॉ. गडाख म्हणाले, ‘‘विद्यापीठाचे सध्या २६ वे मानांकन असून, पहिल्या दहामध्ये समावेश होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सेंद्रिय शेती प्रमाणीकरणाचा पदवी अभ्यासक्रम पहिल्यांदा येथे सुरु झाला. ३० विद्यार्थ्यांची पहिली बॅच ११ महिन्यांच्या अभ्यासक्रमातून बाहेर निघेल.

विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग सुरू आहेत. आगामी शिवारफेरीमध्ये शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिके दाखवण्यासाठी काम सुरू आहे. प्रक्षेत्रावर महाकाय शेततळी उभारल्याने त्यात सुमारे ९० कोटी लिटर पाणी साठवणक्षमता तयार झाली.

Dr. Sharad Gadakh
Pdkv, Akola : शेतकऱ्यांनी दिले उत्पन्न वाढीचे सूत्र

विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाची स्थापना केली जात आहेत. आतापर्यंत ३२ मंच तयार झाले असून, ११०२ शेतकरी त्यात सहभागी झाले.

विद्यापीठ कार्यक्षेत्रातील ११ जिल्ह्यांमध्ये मॉडेल व्हिलेज तयार केले जाणार आहेत. विद्यापीठ निर्मित वाण, यंत्र, उत्पादनांची त्या त्या जिल्ह्यात विक्रीची व्यवस्था केली आहे.’

सोम्या दाश सर्वाधिक सुवर्णपदकांची मानकरी

३७ व्या दीक्षान्त सोहळ्यासाठी कृषिमंत्री अब्दुल सत्तार, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे माजी उपमहासंचालक (शिक्षण) डॉ. नरेंद्रसिंह राठौर यांची प्रमुख उपस्थिती राहील. या सोहळ्यात एकूण ४३२७ जणांना पदवी दिली जाईल.

यात कृषी विद्याशाखा व कृषी अभियांत्रिकी विद्याशाखेच्या ४२१५ पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम विद्याशाखेचे ८२, आचार्य ३० अशा पदव्यांचा समावेश राहील. नागपूरच्या सोम्या शेफालिका दाश हिने सर्वाधिक ७ सुवर्ण व एक रौप्य असे ८ पदके कमावली आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com