
नगर ः कृषी खात्यात (Department Of Agriculture) जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (Agriculture Officer) (एसएओ) दर्जाची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया अखेर सुरू झाली आहे. या पदांवर उपसंचालक, उपविभागीय अधिकाऱ्यांना पदोन्नती (Agriculture Official Promotion) दिली जात आहे.
मात्र शासनाने केलेल्या सेवाज्येष्ठता यादीतील राखीव प्रवर्गातील अधिकाऱ्यांना डावलले असून, पदोन्नतीसाठी असलेल्या यादीत समावेशच केला नसल्याचा आरोप सेवा ज्येष्ठता यादीतील अधिकाऱ्यांनी केला आहे. या बाबत वरिष्ठांकडे दाद मागणार असल्याचे या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
राज्यात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदाच्या नियुक्त पदोन्नतीने केल्या आहे. अनेक वर्षांपासून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदाच्या पदोन्नत्या झाल्या नाहीत. यंदा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदावर पदोन्नतीसाठी सेवाज्येष्ठतेनुसार उपसंचालक, उपविभागीय कृषी अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या १९३ अधिकाऱ्यांची यादी तयार केली. आता त्यातील ८१ उपसंचालक, उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदावर पदोन्नती देण्याची प्रक्रिया चालू आहे.
महाराष्ट्र कृषी सेवेतून भरले जाणारे उपसंचालक पद सध्या ‘गट-अ’ संवर्गात आहे. तर एसएओ पद ‘गट-अ (वरिष्ठ)’ संवर्गात गणले जाते. वरिष्ठ संवर्गात पदोन्नती देताना सध्याच्या उपसंचालकांना त्यांच्या पसंतीचा विभाग देण्याचे प्रयत्न चालू आहेत. त्यासाठी सोयीची नियुक्ती हवी असल्याबाबत विकल्प मागवले आहे.
मात्र पदोन्नती देण्यात येत असलेल्या ८१ लोकांच्या यादीची सेवाज्येष्ठतेनुसार असल्याचे सांगितले जात असले, तरी त्यात सेवाज्येष्ठता असूनही राखीव प्रवर्गातील उपसंचालक, उपविभागीय अधिकारी पदावर काम करत असलेल्या अधिकाऱ्यांना डावलले असल्याचे सेवा ज्येष्ठतेत वरच्या क्रमाकांवर नाव असूनही पदोन्नतीसाठी तयार केलेल्या ८१ लोकांच्या यादीत नाव नसलेल्या एका अधिकाऱ्यांने सांगितले. असे सुमारे ३५ च्या जवळपास अधिकारी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. वेळप्रसंगी न्यायालयात जाण्याचीही या अधिकाऱ्यांची तयारी असल्याचे दिसत आहे.
...तर ते आमच्यापेक्षा ज्येष्ठ कसे?
सेवाज्येष्ठता यादीत वरच्या क्रमांकावर नाव आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदावर पदोन्नती देताना सेवाज्येष्ठता लागू केल्याचे सांगितले जात आहे. मात्र ज्या ८१ लोकांना पदोन्नती देत विकल्प मागविले, त्या यादीत आमच्यानंतर दोन ते चार वर्षांनी सेवेत आलेले अधिकारी समाविष्ट आहेत. जर आमच्यानंतर सेवेत आले असतील तर ते आमच्यापेक्षा ज्येष्ठ कसे होऊ शकतात, असा प्रश्न या अधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.