APMC Election In Khandesh : खानदेशात दिग्गजांना बसला धक्का

बाजार समितीच्या निवडणुकीसंबंधी शनिवारी (ता. २९) मतमोजणी झाली. त्यात अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला आहे. कमाल बाजार समित्यांत युतीला कौल मिळाला आहे.
APMC Election
APMC ElectionAgrowon

APMC Election In Khandesh बाजार समितीच्या निवडणुकीसंबंधी शनिवारी (ता. २९) मतमोजणी झाली. त्यात अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला आहे. कमाल बाजार समित्यांत युतीला कौल मिळाला आहे.

नंदुरबारात पालकमंत्री विजयकुमार गावित यांचे बंधू प्रकाश गावित पराभूत झाले. भुसावळात भाजपने १८ पैकी १५ जागा जिंकून सत्ता खेचली. तेथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) व माजी आमदार संतोष चौधरी यांना हा धक्का मानला जात आहे.

खानदेशात धुळ्यातील दोंडाईचा (ता. शिंदखेडा), नंदुरबारमधील शहादा, जळगावमधील जामनेर, चाळीसगाव व भुसावळ या बाजार समित्यांत भाजपने विजय मिळविला. तर नंदुरबारमधील नंदुरबार बाजार समितीत शिवसेनेने (शिंदे गट) विजय मिळविला.

चोपडा (जि.जळगाव) बाजार समितीत त्रिशंकू स्थिती झाली आहे. महाविकास आघाडीला जळगावात रावेर, पारोळा व नंदुरबारमधील नवापूर येथे विजय मिळाला.

APMC Election
APMC Election Maharashtra : बाजार समित्यांवर ‘मविआ’चे वर्चस्व!

नंदुरबार जिल्ह्यात नवापुरात काँग्रेसने काट्याची लढत देत ११ जागा जिंकून सत्ता मिळविली. तेथे भाजप नेते भरत गावित यांच्या पॅनेलचा पराभव झाला. नंदुरबार बाजार समितीत शिवसेनेचे नेते (शिंदे गट) चंद्रकांत रघुवंशी यांच्या पॅनेलचा विजय झाला. रघुवंशी यांच्या पॅनेलच्या १५ जागा निवडून आल्या.

शहादा येथे अभिजित पाटील यांच्या शेतकरी पॅनेलला ११ जागांवर कौल मिळाला. तेथे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित व भाजप नेते दीपक पाटील, भाजपचे शहादा येथील आमदार राजेश पाडवी यांचेही पॅनेल होते. पण भाजप नेते मोतीलाल पाटील यांचे पुत्र अभिजित पाटील यांच्या पॅनेलला सत्ता मिळाली.

शहादा येथे माजी सभापती सुनील पाटील व माजी उपसभापती रवींद्र रावळ यांचा पराभव झाला. धुळ्यात दोंडाईचा (ता.शिंदखेडा) बाजार समितीत भाजप नेते जयकुमार रावल यांच्या पॅनेलचा सर्व १८ जागांवर विजय झाला.

जळगावात भाजपची घोडदौड

जळगाव जिल्ह्यात भाजपने तीन बाजार समित्यांत विजय मिळविला. भुसावळात भाजप पुरस्कृत पॅनेलच्या १५ जागा निवडून आल्या.

महाविकास आघाडीचे माजी आमदार संतोष चौधरी यांच्या पॅनेलचा तेथे पराभव झाला. चाळीसगाव येथे आमदार मंगेश चव्हाण व खासदार उन्मेष पाटील यांच्या पॅनेलला १३ जागांवर विजय मिळाला.

तेथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजीव देशमुख यांच्या पॅनेलला पराभवाचा धक्का बसला. जामनेरात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलचा सर्व १८ जागांवर विजय झाला.

APMC Election
Pune APMC Election : पुणे बाजार समितीच्या किल्ल्‍या भाजप पुरस्कृत ‘राष्‍ट्रवादी’च्या ताब्यात

जळगाव जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष पराभूत

रावेरात १३ जागांवर महाविकास आघाडीचा विजय झाला. भाजपचे उमेदवार तीन तर दोन जागांवर अपक्ष विजयी झाले.

पारोळा येथे महाविकास आघाडीच्या १५ जागा निवडून आल्या. तेथे शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील यांचे पुत्र तथा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील पराभूत झाले.

चोपडा येथे त्रिशंकू स्थिती झाली. तेथे शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या पॅनेलला नऊ, घनःश्याम पाटील यांच्या पॅनेलला पाच आणि राष्ट्रवादी काँग्रेसला चार जागांवर विजय मिळाला.

दोन बाजार समित्यांसाठी आज मतदान, तर नऊ बाजार समित्यांची मतमोजणी

धुळ्यातील साक्री व शिरपूर या बाजार समित्यांसाठी रविवारी (ता. ३०) मतदान व लागलीच मतमोजणी होणार आहे. तसेच धुळे बाजार समितीसंबंधीदेखील मतमोजणी रविवारी होईल. तसेच जळगावमधील जळगाव, धरणगाव, पाचोरा, बोदवड, अमळनेर व यावल या बाजार समित्यांसंबंधीदेखील मतमोजणी रविवारी होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com