Sugarcane Cultivation : सोलापूर जिल्ह्यात उसाचे सर्वाधिक क्षेत्र

Sugarcane Season : येत्या गाळप हंगामात राज्यात सोलापूर जिल्ह्यात गाळपासाठी सर्वाधिक दोन लाख ४० हजार ९५७ हेक्टर क्षेत्रातील ऊस उपलब्ध आहे.
Sugarcane Cultivation
Sugarcane CultivationAgrowon

Solapur News : येत्या गाळप हंगामात राज्यात सोलापूर जिल्ह्यात गाळपासाठी सर्वाधिक दोन लाख ४० हजार ९५७ हेक्टर क्षेत्रातील ऊस उपलब्ध आहे. मागील हंगामाच्या तुलनेत यंदा त्यामध्ये सुमारे १० हजार हेक्टरने वाढ झाली आहे.

गेल्यावर्षी जिल्ह्यात ३७ कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला होता. यावर्षी सोलापूर जिल्ह्यात अजूनही दमदार पाऊस झालेला नाही. त्याची झळ ऊस पिकाला चांगलीच बसली आहे. परिणामी, उसाचे एकरी टनेज घटण्याची शक्यता आहे.

२०२२-२३ चा गळीत हंगामात राज्यात १४ लाख ८७ हजार ८३६ हेक्टर क्षेत्रातील उसाचे गाळप होऊन १०५३.९१ लाख टन साखर उत्पादन झाले होते. यंदा राज्यात १४ लाख ३७ हजार २१ हेक्टर क्षेत्रातील ऊस गाळपास उपलब्ध आहे. यंदा पावसाने दिलेला दगा, त्यामुळे उसाची खुंटलेली वाढ, पाण्याअभावी वाळलेले उसाचे मळे, जनावरांच्या चाऱ्यासाठी उसाचा झालेला वापर या कारणाने गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी उसाच्या क्षेत्रात सुमारे ५१ हजार हेक्टरने घट संभवते.

तथापि, प्रादेशिक सहसंचालक (साखर) व कृषी विभाग यांनी संयुक्तपणे १४ लाख ८३ हजार ७९२ हेक्टर उसाचे क्षेत्र यावर्षी राज्यात गाळपासाठी निश्चित केले आहे. त्यामुळे गत हंगामाच्या तुलनेत येत्या हंगामात चार हजार ४४ हेक्टर क्षेत्राची तूट दिसते. मागील वर्षी राज्यात हेक्टरी सरासरी ७१ टन उसाचे टनेज मिळाल्याचे आकडेवारीवरून दिसते.

Sugarcane Cultivation
Sugarcane Workers : अन्यथा कारखान्यांचे धुराडे पेटवू देणार नाही, ऊस तोडणी कामगार आक्रमक

पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, नांदेड, अमरावती व नागपूर या विभागात उसाचे क्षेत्र घटले आहे. अहमदनगर विभागात सर्वाधिक २५ हजार ८११ हेक्टरची घट आहे. त्यानंतर नांदेड विभागात २२ हजार ४७१ हेक्टर, औरंगाबाद विभागात १४ हजार ७९ हेक्टर, पुणे विभागात १४ हजार ३२ हेक्टर, अमरावती विभागात दोन हजार ६७१ हेक्टर तर नागपूर विभागात एक हजार २६४ हेक्टर उसाचे क्षेत्र कमी आहे. कोल्हापूर विभागात उसाच्या क्षेत्रात १७ हजार ८०७ तर सोलापूर विभागात ११ हजार ७०७ हेक्टरने वाढ झालेली दिसते.

गेल्या हंगामाच्या तुलनेत नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक १८ हजार १४२ हेक्टर उसाचे क्षेत्र घटले आहे. त्यानंतर पुणे जिल्ह्यात १४ हजार ११८ हेक्टर, जळगाव जिल्ह्यात नऊ हजार ६४२ हेक्टर, लातूर जिल्ह्यात आठ हजार ९०३ हेक्टर, हिंगोली जिल्ह्यात आठ हजार ६७९ हेक्टर, अहमदनगर जिल्ह्यात सात हजार ६६९ हेक्टर, परभणी जिल्ह्यात सात हजार ३६१ हेक्टर, नंदुरबार जिल्ह्यात दोन हजार ४९४ हेक्टर, बीड जिल्ह्यात दोन हजार ५५ हेक्टर, औरंगाबाद जिल्ह्यात एक हजार ४८४ हेक्टर तर जालना जिल्ह्यात एक हजार ४८ हेक्टर उसाचे क्षेत्र कमी झाले आहे.

Sugarcane Cultivation
Sugarcane FRP : 'छत्रपती'चा दुसरा हप्ता १५० रुपये प्रतिटन

प्रादेशिक सहसंचालक (साखर) व कृषी विभागाने संयुक्तपणे निश्चित केलेल्या ऊस क्षेत्रानुसार अहमदनगर जिल्ह्यात ११ हजार ६१२ हेक्टर, जळगाव जिल्ह्यात सात हजार ३०० हेक्टर, नंदुरबार जिल्ह्यात तीन हजार ३९६ हेक्टर, नाशिक जिल्ह्यात सहा हजार ७७ हेक्टर, सांगली जिल्ह्यात एक हजार ८९६ हेक्टर, नांदेड जिल्ह्यात एक हजार ७०१ हेक्टरने उसाचे क्षेत्र घटले आहे. बीड जिल्ह्यात नऊ हजार ३९९ हेक्टर, जालना जिल्ह्यात सहा हजार ६०५ हेक्टर, परभणी जिल्ह्यात तीन हजार ७५८ हेक्टर, हिंगोली जिल्ह्यात एक हजार, औरंगाबाद जिल्ह्यात दोन हजार २४१ हेक्टर उसाचे क्षेत्र वाढले आहे.

मागील दहा वर्षांतील राज्यातील उसाचे क्षेत्र (हेक्टरमध्ये)

हंगाम उसाखालील क्षेत्र

२०१३-१४ ९.३७

२०१४-१५ १०.५४

२०१५-१६ ९.८७

२०१६-१७ ६.३३

२०१७-१८ ९.०२

२०१८-१९ ११.६२

२०१९-२० ८.२२

२०२०-२१ ११.४२

२०२१-२२ १४.८८

२०२२-२३ १४.८७

जिल्हानिहाय उपलब्ध उसाचे अंदाजित क्षेत्र (हेक्टरमध्ये)

जिल्हा २०२३-२४ हंगाम

सोलापूर २,४०,०००

कोल्हापूर १,८८,०९०

अहमदनगर १,५२,३३१

पुणे १,४३,४५२

सांगली १,४४,१२७

सातारा १,१६,७११

बीड ८२,१५३

धाराशिव ७५,०७५

लातूर ५४,२५५

जालना ४८,२७५

परभणी ३९,६९७

औरंगाबाद ३८,५१६

नांदेड ३८,६८३

नाशिक १२,८२३

नंदुरबार २१,५४७

हिंगोली ८,७७१

जळगाव ६,३५८

यवतमाळ १०,२०४

धुळे ४,९२८

भंडारा ४,०१३

नागपूर २,४०३

वर्धा १,२५४

गोंदिया १,७३५

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com