Drought : नागरी सुविधांसह दुष्काळ जाहीर करा

Kharif Season : राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी लागवड केलेला खरीप हंगाम वाया गेला.
Drought
Drought Agrowon

Nashik News : राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी लागवड केलेला खरीप हंगाम वाया गेला. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. शहरात विविध नागरी सुविधांचा अभाव आहे.

नागरिकांना रस्ते, पाणी, वीज आदी मूलभूत सुविधा मिळत नसल्याने नागरी सुविधांसह दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची जन संघटना ‘सीटू’ व किसान सभेच्या शिष्टमंडळाने अप्पर जिल्हाधिकारी माया पाटोळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Drought
Marathwada Drought : अवर्षणग्रस्त मराठवाड्याला भेडसावतोय निधीचा दुष्काळ

कसमादे परिसरात दमदार पाऊस न झाल्याने खरीप हंगाम वाया गेल्याने राज्यात दुष्काळ जाहीर करुण शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, ग्रामीण भागात रोजगार हमीची कामे सुरू करावी. मालेगावात हॉकर्स झोनची जागा निश्‍चित करावी. स्वच्छतागृहांची व्यवस्था नसलेल्या यंत्रमाग कारखान्यांवर कारवाई करावी.

Drought
Drought Condition : ‘गुगल मॅपिंग’द्वारे होणार अवर्षणाचे सर्वेक्षण

डाळी, कडधान्यांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. शासनाने महागाईवर नियंत्रण आणावे. रमजानपुरा भागात अनेक नागरी सुविधांचा अभाव आहे. या भागातील रस्ते दुरुस्त करावेत. मुस्लीम समाजाच्या सणांना देखील आनंदाचा शिधा देण्यात यावा.

निवेदनावर तालुका किसान सभेचे देविदास सुरंजे, गोरख माळी, कॉम्रेड अशोक सावंत, रमेश जगताप, अर्जून ठाकरे, उत्तम निकम, माणिक पवार, युवराज पवार, गोकूळ ठाकरे, सुनील गांगुर्डे, तुळशीराम सोनवणे, वाहिद अली, असगर अली, सलीम शहा, केशव भोईर, रायसिंग मोरे, गोरेख माळी, रवींद्र पवार आदीचा स्वाक्षऱ्या आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com