Water Conservation : ‘डीसीएम श्रीराम अॅगवॉटरचॅलेंज’ स्पर्धेस सुरवात

Water Management : देशातील लोकसंख्येला पुरेसा पाणी पुरवठा करण्यासाठी उपाययोजना आणि जल व्यवस्थापनात नवीन तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांनी कळविले आहे.
Water Conservation
Water ConservationAgrowon

Pune News : डीसीएम श्रीराम फाउंडेशन आणि ‘द नज इन्स्टिट्यूट’च्या ‘सेंटर फॉर सोशल इनोव्हेशन'तर्फे केंद्र सरकारच्या प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाच्या सहयोगाने ‘डीसीएम श्रीराम अॅगवॉटर चॅलेंज' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

Water Conservation
Satara Water Crisis: सातारा जिल्ह्यात ५५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा

देशातील लोकसंख्येला पुरेसा पाणी पुरवठा करण्यासाठी उपाययोजना आणि जल व्यवस्थापनात नवीन तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांनी कळविले आहे. स्पर्धेमध्ये विविध विजेत्यांना एकूण २.६ कोटी रुपयांची बक्षीसे दिली जाणार आहेत.

स्पर्धेतील सुरवातीचे आव्हान यशस्वीरीत्या पार करून अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या तीन स्पर्धकांना एकूण ६० लाख रुपयांची बक्षिसे आहेत. स्पर्धेच्या माध्यमातून कृषिजल व एसएचएफ तज्ज्ञांचा अभ्यास गट तयार होत आहे.

Water Conservation
Water Supply : बारामतीत उद्यापासून दिवसाआड पाणी पुरवठा

या स्पर्धेच्या माध्यमातून निवडक १५ ते २० उपायांचा समूह शोधला जाणार आहे. यामध्ये विशेषतः भात, कापूस, ऊस, गहू या सारख्या अधिक पाणी लागणाऱ्या पिकांच्या पाणी व्यवस्थापनाबाबत उपाय शोधणाऱ्यांचा समावेश असणार आहे.

स्पर्धेबाबत माहिती देताना फाउंडेशनचे अध्यक्ष अमन पन्नू म्हणाले, ‘‘जलसंवर्धनासाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे, पाणी वापराची कार्यक्षमता सुधारणे हे आव्हानात्मक काम आहे. हाच दृष्टिकोन ठेवून स्पर्धेचे आयोजन केले आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांना डोळ्यापुढे ठेवून क्लिष्ट समस्यांवर नवीन उपाय व्यापक प्रमाणावर शोधणाऱ्या तंत्रज्ञानप्रधान कृषी स्टार्टअप्स आणि सामाजिक उद्योजकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे.’’

‘जलव्यवस्थापनाच्या प्रारूपाची कमतरता’

‘‘‘द नज प्राइज'च्या संचालिका कनिष्का चॅटर्जी म्हणाल्या, ‘‘छोट्या व सीमांत शेतकऱ्यांसाठी परवडण्याजोग्या जलव्यवस्थापनाच्या प्रारूपाची कमतरता आहे. डीसीएम श्रीराम अॅगवॉटर चॅलेंज स्पर्धेमुळे कृषी तंत्रज्ञान क्षेत्राला तातडीने उपयोजना करण्याची प्रेरणा मिळणार आहे.’’

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com