Dairy Product Import : ... तर दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी काळा दिवस ठरेल

या संदर्भात माजी कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरूवारी (ता. ६) केंद्रीय पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री पुरूषोत्तम रुपाला यांना पत्रही लिहले आहे.
Dairy Product Import
Dairy Product ImportAgrowon

Dairy Product Import : केंद्र सरकारने दुग्धजन्य पदार्थांची आयात (Dairy Product Import) करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Dairy Farmer) काळा दिवस ठरेल, अशी प्रतिक्रिया सोनाई उद्योगाचे प्रमुख दशरथ माने (Dasharath Mane) यांनी दिली आहे.

या संदर्भात माजी कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी गुरूवारी (ता. ६) केंद्रीय पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री पुरूषोत्तम रुपाला (Purshottam Rupala) यांना पत्रही लिहले आहे.

दुग्धजन्य पदार्थ आयातीच्या केंद्राच्या आयाती संदर्भात दशरथ माने यांनी साम टिव्हीला प्रतिक्रिया दिली आहे. माने म्हणाले की, केंद्र सरकारने बटर आणि बटर ऑईल आयात करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी बातमी मीडियाच्या माध्यमातून समजली.

Dairy Product Import
Dairy Import : दुग्धजन्य पदार्थ आयातीचा निर्णय शेतकऱ्यांसाठी घातक

गेल्या तीन वर्षांमध्ये कोरोनामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोरोनामध्ये गायीच्या दुधाला २०-२२ आणि म्हशीच्या दुधाला ४०-४२ रुपयांचा दर शेतकऱ्यांना मिळाला. परिणामी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असल्याचे माने म्हणाले.

अशा परिस्थितीत केंद्र सरकारने बटर आणि बटर ऑईल आयात करण्याचा निर्णय घेतलेला आहे. केंद्र सरकारने जर हा निर्णय घेतला, तर शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा काळा दिवस ठरेल. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल. तसेच १०-१२ रुपये प्रतिलिटर दुधाचे दर कमी होऊ शकतात, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असे माने म्हणाले.

Dairy Product Import
Dairy Product Import : केंद्र सरकार करणार लोणी आणि तुपाची आयात?

भारतात बटर आणि बटर ऑईलचे उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे. आज महाराष्ट्रात सात ते आठ हजार टन बटर शिल्लक आहे. को-ऑपरेटिव्ह आणि फेडरेशनकडे कमी प्रमाणत बटर शिल्लक असेल, परंतु खासगी उद्योगाकडे मोठ्या प्रमाणात बटर शिल्लक आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणीही माने यांनी यावेळी केली.

दरम्यान, केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्रालयाचा लोणी आणि तूप यासारखे दुग्धजन्य पदार्थ आयात करण्याचा हेतू आहे. यासंदर्भात केंद्राचा कोणताही निर्णय पूर्णपणे अस्वीकार्य असेल, असे शरद पवार यांनी केंद्रीय मंत्र्यांना लिहिलेल्य़ा पत्रात म्हटले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com