Akola Crop Damage : अकोला जिल्ह्यात १४ हजार हेक्टरवर नुकसान

Heavy Rain Crop Damage : मूर्तिजापूर तालुक्यात नदी-नाल्यांना आलेल्या पुराने अतोनात नुकसान झाले. या एकाच तालुक्यात ८२९० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.
Crop Damage
Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Akola News : जिल्ह्यात मूर्तिजापूर, बार्शीटाकळी, अकोला तालुक्यांत झालेल्या जोरदार पावसाचा सुमारे १४ हजार २९२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आला आहे. तर, ५१५ हेक्टर जमीन खरडून गेली आहे.

जिल्हयात मंगळवारी (ता.१८) रात्री सुमारे पाच तास पाऊस सुरू होता. या पावसाने एकच दाणादाण उडवली.

Crop Damage
Akola Bribe News : मृत जनावरांच्या मोबदल्यासाठी ८ हजारांची मागितली लाच

मूर्तिजापूर तालुक्यात नदी-नाल्यांना आलेल्या पुराने अतोनात नुकसान झाले. या एकाच तालुक्यात ८२९० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. २९२ हेक्टर जमीन खरडली. बार्शीटाकळीमध्ये २०६० हेक्टरवरील पिकांचे नुकसान तर १३० हेक्टर जमीन खरडली. अकोला तालुक्यातही ३ ९४२ हेक्टरवरील पिकांचे पावसामुळे नुकसान झाले.

Crop Damage
Akola Rain News : जून कोरडा गेल्याने शेतकऱ्यांच्या चिंता कायम

९३ हेक्टर जमीन खरडून गेली. मूर्तिजापूर तालुक्‍यात खरब ढोरे गावाला नाल्याला आलेल्या पुराने वेढले होते. घरांमध्ये पाणी शिरले होते. या तालुक्यात ४५ घरे पडली असून २१० घरांचे अंशतः नुकसानही झाले. नुकसानाची तीव्रता पाहता महसूल, कृषी विभागाची यंत्रणा कामाला लागली.

जिल्ह्यात आजवर मुबलक पाऊस नसल्याने पेरण्या खोळंबल्या होत्या. गेल्याच आठवड्यात सार्वत्रिक पाऊस सुरू झाल्याने प्रामुख्याने कोरडवाहू क्षेत्रात पेरणी झाली. या जमिनीवर पीक नुकतेच अंकुरले असताना ही नैसर्गिक आपत्ती आली. प्राथमिक अंदाजानुसार १४ हजार हेक्टरवर नुकसान दाखवण्यात आले आहे. मात्र, अंतिम अहवालानंतर हे नुकसान वाढू शकते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com