Mango Crop Damage : सुरगाणा तालुक्यात पावसाने आंब्याचे नुकसान वाढले

गेल्या दोन महिन्यांपासून वादळी वाऱ्यासह पावसाचा तडका जिल्ह्याला बसत आहे. यामध्ये सुरगाणा तालुक्यात गत सप्ताहात सलग दोन दिवस वादळी पावसाने जोरदार तडाखा दिला.
Mango Crop Damage
Mango Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Mango Crop Damage गेल्या दोन महिन्यांपासून वादळी वाऱ्यासह पावसाचा तडका जिल्ह्याला बसत आहे. यामध्ये सुरगाणा तालुक्यात गत सप्ताहात सलग दोन दिवस वादळी पावसाने (Unseasonal Rain) जोरदार तडाखा दिला.

शुक्रवारी (ता.५) दोन तास पाऊस झाला. त्यामुळे पश्चिम पट्ट्यातील आंबा पिकाला पुन्हा मोठा फटका बसला आहे. मोहरातील आंबा पिकाचे नुकसान (Mango Crop Damage) होत आहे. आता पुन्हा पावसाचा दणका बसल्याने कैऱ्या तुटून पडल्याने नुकसान वाढले आहे.

तालुक्यात २ हजार हेक्टरवर आंबा लागवडी आहेत. त्यामुळे निर्यातक्षम केसर आंबा उत्पादनात हा भाग ओळखला जातो. मात्र ऐन हंगामाच्या तोंडीच उंबरठाण, बाऱ्हे, पळसन, बोरगाव, चिंचले, बर्डीपाडा, खुंटविहीर, सुरगाणा परिसर, अलंगुण, पिंपळसोंड या भागांत पावसाने हजेरी लावली.

Mango Crop Damage
Crop Damage : कांदा भिजला; टोमॅटो, मिरचीचेही मोठे नुकसान

त्यामुळे आंबा उत्पादकांच्या अडचणी वाढल्या आहेत. या पावसाने जनावरांचा चारा, भाताचे तनस, भाताच्या पेंढ्या, आंबा बागेचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी कैऱ्या गळून पडल्या, तर आंबा फळांवर डाग पडल्याने प्रतवरीत घसरण झाली आहे.

Mango Crop Damage
Crop Damage : जळगावात पावणेचार हजार हेक्टरवर पिकांचे नुकसान

आदिवासी पाड्यावरील आंब्याला चव व गुणवत्तेमुळे मागणी असते. त्यामुळे मागील वर्षी तेथील आंबा निर्यात झाला होता. मात्र यंदा त्यावर परिणाम झाला आहे. पावसाने फटका दिल्याने यावर्षी उत्पादनासह उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

यापूर्वी बाऱ्हे, गडगा, सर्कलपाडा, हट्टीपाडा, झगडपाडा, मनखेड, म्हैसमाळ, आवळपाडा, ठाणगाव, सुकतळे, केळावण, गडगा, गोपाळपूर, कचूरपाडा, अंबोडे, उंडओहळ बाऱ्हे, वाघनखी या भागातील आंबा पिकाचे नुकसान झाले होते.

मार्चपासून नुकसान सुरूच

मार्चच्या अखेरीस वादळी वाऱ्यासह वादळामुळे मोहरानंतर आंबा फळ लागून वाढीच्या अवस्था असताना अनेक भागात वादळी पावसाने मोहोर झडून गेला. लहान कैऱ्या वाऱ्यामुळे पडल्या. बुरशीजन्य रोगांचाही प्रादुर्भाव झाला.

मार्चच्या अखेरीस वादळी वाऱ्यामुळे मोहर गळून पडला. लहान कैऱ्या गळाल्या. हे नुकसान त्यावेळी मोठे असताना अडचणी होत्याच; मात्र आता पुन्हा एकदा पाऊस झाल्याने नव्याने संकट उभे राहिले आहे. त्यामुळे उत्पादन व उत्पन्नावर परिणाम होईल.
- केशव पालवी, अध्यक्ष, सुरगाणा शेतकरी उत्पादक कंपनी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com