Jalgaon News जिल्ह्यात २९ एप्रिलला वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे (Hailstorm) तब्बल तीन हजार ८७६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान (Crop Damage झाले आहे. त्याचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. त्याचा अहवाल कृषी विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे.
केळी, मका, बाजरी, ज्वारी या पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे. पाच हजार ८९३ शेतकरी बाधित झाले आहेत, असा प्राथमिक अहवाल जिल्हा कृषी विभागाने जाहीर केला आहे.
जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा बसत आहे. वादळी पावसामुळे अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. यंदा एप्रिल महिन्यात वादळी पाऊस झाला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जागतिक तापमानवाढ, ‘अल निनो’च्या प्रभावामुळे उन्हाळ्यात पाऊस पडत आहे. उन्हाळ्यात सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा म्हणून जळगावची ओळख आहे.
यंदा अवकाळी पावसामुळे एप्रिल महिन्याचे तापमान ४० अंशांच्या आतच राहिले. आगामी काही दिवसही पावसाचे असल्याने तापमान ३९ ते ४० अंशांपर्यंत राहिले.
जळगाव जिल्ह्यात मे महिन्यात तापमान ४४ ते ४५ अंशांदरम्यान असते. मात्र वादळी पावसाने तापमानाची तीव्रता कमी करून नागरिकांना दिला असला, तरी पीक, घरांचे नुकसान होत आहे.
सहा तालुक्यांत ५ ८९३ शेतकरी बाधित
शेतकरी या नुकसानीमुळे बाधित झाले आहेत. त्यांच्या डोळ्यांदेखत हातातोंडाशी आलेला घास अस्मानी संकटाने हिरावून नेला आहे. वादळी पावसामुळे पीक नुकसान स्थिती
तालुका--शेतकरी--क्षेत्र हेक्टर
अमळनेर --१ हजार ३१६--८३८
पारोळा--३३३--१८०.००
जामनेर--३ हजार ११५--१७२९.६०
पाचोरा--६६--४२
यावल--१६७ --१९०.२०
रावेर--८९६--८९६
एकूण--५८९३--३८७६
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.