Pre-Mosoon Rain : पूर्वमोसमी पाऊस, वादळी वाऱ्याने नुकसान

Maharashtra Weather Update : राज्याच्या विविध भागात रविवारी दुपारनंतर जोरदार वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी वाऱ्यांनी हजेरी लावली. मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक होता.
Crop Damage
Crop Damage Agrowon

Pune News : राज्याच्या विविध भागात रविवारी दुपारनंतर जोरदार वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी वाऱ्यांनी हजेरी लावली. मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक होता. वादळी वाऱ्यामुळे आंबा, केळी, पपईसह फळ पिके, भाजीपाला आणि उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. वीज कोसळून जिवीत हानी झाल्याच्या घटना घडल्या. सोमवारी (ता. ५) दुपारनंतर अनेक ठिकाणी ढगाळ हवामान झाले होते.

मराठवाड्याच्या विविध भागात रविवारी (ता. ४) दुपारनंतर वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात वीज पडून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू तर सहा जनावर दगावली. छत्रपती संभाजीनगरसह सोयगाव, वैजापूर, पैठण, फुलंब्री, सिल्लोड, कन्नड, खुलताबाद, गंगापूरमध्ये वाऱ्याचा तडका बसला. पैठण तालुक्यातील गेणतपुर शिवारातील गट नंबर ५२ मधील शिवारात जोरदार वादळामुळे केळीची झाडे जमीनदोस्त झाली.

सातारा जिल्ह्यातील माण, फलटण, खटाव तालुक्यांत काही ठिकाणी पूर्वमोसमी पावसाने वादळी वाऱ्यासह दमदार हजेरी लावली आहे. दहिवडी सह माण तालुक्याच्या पश्चिम भागाला सोसाट्याच्या वादळी वाऱ्याचा जबरदस्त तडाखा बसला. पावसामुळे भाजीपाला, फळबागांचे नुकसान झाले आहे. आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले. यासोबतच मुसळधार पावसाने ओढ्याला पूर आला तर बंधारे भरभरून वाहिले.

Crop Damage
Unseasonal Rain Update : अमरावतीत अकरा हजार हेक्टरमधील पिकांना अवकाळीचा फटका

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून सोमवार (ता. ५) सकाळपासून पावसाचे वातावरण आहे. जिल्ह्यात काही भागातील शिडकावा वगळता कुठेही पाऊस झाला नाही. सोमवार सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ आणि पावसाचे वातावरण आहे.

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील काही भागात रविवारी (ता.४) सायंकाळी वादळी वाऱ्यामुळे केळी पिकांचे व आंब्याचे मोठे नुकसान झाले. पापरी, खंडाळी, चिखली, येवती यासह अन्य गावातील केळीबागा भुईसपाट झाल्या.

पुणे जिल्‍ह्याच्या विविध भागांत रविवारी (ता.४) सायंकाळी मॉन्सून पूर्व पावसाने झोडपले. शेतीच्या नुकसानीत केळी, बाजरी आणि आंब्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात पावसामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली.

जवळपास एक तासाहून अधिक वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने आंबा उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. जुन्नरच्या पश्चिम भागातील आपटाळे, खानगाव, आंबोली, पाडळी, इंगळून, शिंदे, जळवंडी, घाटघर या परिसराला वादळी वाऱ्यासह पावसाने जवळपास एक तास झोडपले.

Crop Damage
Pre-Monsoon Rain : नाशिक जिल्ह्यात पूर्वमोसमी वादळी पावसाने दाणादाण

सोमवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांत राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस मिलीमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) :

कोकण : मोखेडा ४०, जव्हार २०, माथेरान, कर्जत, वाडा, तलासरी, विक्रमगड, डहाणू प्रत्येकी १०.

मध्य महाराष्ट्र : हर्सूल ५०, यावल, दहिगाव, पेठ प्रत्येकी ४०, कसबे डिग्रज ३०, चास, चाळीसगाव, शिरूर, सांगली, सटाना, मिरज अंमळनेर, एरंडोल प्रत्येकी २०, महाबळेश्वर, जत, सासवड, पुणे, पौड, पारोळा, जुन्नर, इगतपुरी, धरणगाव, त्रिंबकेश्वर, कर्जत, चोपडा, भडगाव प्रत्येकी १०.

मराठवाडा : सोयेगाव ३०, धर्माबाद, आष्टी प्रत्येकी २०, जळकोट, उदगीर प्रत्येकी १०.

विदर्भ : दिग्रस २०, मातोळा, नेर, मोर्शी, पुसद, मलकापूर, आर्णी, बाभूळगाव प्रत्येकी १०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com