Diwali Market : ग्राहकांनी पाडव्याचा मुहूर्त साधला

दिवाळीत बाजारपेठेत खरेदीसाठी लगबग
Diwali Market
Diwali MarketAgrowon

सासवड, जि. पुणे ः गतवर्षी कोरोनाचे थोडे निर्बंध असल्याने व यंदा कोविडची लाट (Covid Wave) ओसरल्याने, तसेच सारेच निर्बंध हटल्याने दिवाळीची लगबग बाजारपेठेत (Crowded Market) लक्षवेधी दिसते आहे; नव्हे तर पाऊल ठेवायला जागा नाही. यंदा कपडे खरेदी, तयार कपडे, आकाश कंदील, दिवे, रोषणाईचे विविध साहित्य, पूजा साहित्य, केरसुणी (लक्ष्मी), किराणा साहित्य, सुका मेवा, मिठाई, तयार फराळ खरेदीला एका चांगला उत्साह आहे. बाळगोपाळांची किल्ले, चित्रे, फटाके खरेदीलाही गेली काही दिवस लगबग दिसत आहे.

Diwali Market
Paddy Crop : देशात भात उत्पादन घटलं

जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांना, माध्यमिक विद्यालये, महाविद्यालयांना व इतर शैक्षणिक संकुलात सुट्टी लागल्याने दिवाळी तयारीला चांगली गती आली. तसेही बरेच बालगोपाळ ऑनलाइनमुळे मागच्या दिवाळीच्या आधी घरीच होते. यंदा दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून थंडीचे प्रमाण सायंकाळपासून पहाटेपर्यंत चांगले असल्याने दिवाळीची पहिली चाहूल काकड आरती घेऊन आली.

सासवड (ता. पुरंदर) ही तालुक्याची मुख्य बाजारपेठ असल्याने कपडे शिवून घ्यावयाची त्यांची आठवड्यापासून उत्साही लगबग आहे, असे शिलाई व्यावसायिक सतीश पारटे, बाळू निरगुडे, शुभांगी नालव्हे, श्रीकांत जगताप यांनी सांगितले. फॅन्सी प्रकाराने व चांगले फिनिशिंग असल्याने तयार कपड्यांना मात्र आता मागणी वाढली आहे. बांबूच्या विणलेल्या टोपल्या, सूप, केरसुणी, विविध प्रकारच्या विद्युतमाळा,

नावीन्यपूर्ण नक्षीदार, लक्षवेधी आकाराचे आणि विविध मटेरियलमधील आकाशदिव्यांना व अनेक प्रकारच्या पणत्यांनाही मोठी मागणी टिकून आहे. मागे काही महिने मंदीत गेलेला जागा प्लॉटिंगचा, फ्लॅट खरेदीचा व्यवहार यंदा दिवाळीनिमित्त सुधारण्याची चिन्हे दिसत आहेत. पाडव्याला हे व्यवहार अधिक होतील, असे व्यावसायिक संदीप राऊत, सुनील पवार, स्वप्नील शेट्टी, नीलेश जगताप, गणेश बांदल, बाळासाहेब भिंताडे आदींनी ‘सकाळ’ला सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com