Kharif Crop : शिरूर तालुक्यात पावसाअभावी पिके कोमेजली

Kharif Season : शिरूर तालुक्यातील पूर्व भागातील आलेगाव पागा, उरळगाव, अरणगाव, रांजणगाव सांडस, दहिवडी, पारोडी, शिवतक्रार म्हाळुंगी, राक्षेवाडी आदी गावांतील भागांत पावसाअभावी यंदाचा खरीप हंगाम वाया जाण्याच्या मार्गावर आहे.
kharif Crop
kharif CropAgrowon
Published on
Updated on

सकाळ वृत्तसेवा
Dry Spell : रांजणगाव सांडस ः शिरूर तालुक्यातील पूर्व भागातील आलेगाव पागा, उरळगाव, अरणगाव, रांजणगाव सांडस, दहिवडी, पारोडी, शिवतक्रार म्हाळुंगी, राक्षेवाडी आदी गावांतील भागांत पावसाअभावी यंदाचा खरीप हंगाम वाया जाण्याच्या मार्गावर आहे. शेतात पावसाअभावी पेरणी व काही शेतकऱ्यांची उसाची लागवड झाली नाही. तर पेरणी झालेल्या क्षेत्रांतील पिके कोमेजून करपू लागली असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.

या हंगामात शिरूर तालुक्यात १६,५२९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून, पावसाअभावी पिके करपून चालली आहेत. कृषी विभागाने खरीप हंगामपूर्व विविध मोहिमा घेऊन शेतकऱ्यांमध्ये पिकाविषयी पुढील प्रमाणे मार्गदर्शन करताना बियाणे उगवणक्षमता चाचणी, बीजप्रक्रिया, रासायनिक खतांचा कमी वापर, हुमणी नियंत्रण आदी प्रभावीपणे राबवून खरीप हंगामचे अत्यंत चांगल्या प्रकारे नियोजन केले होते. परंतु ऐन हंगामात पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी वर्गाची चिंता वाढत चाललेली दिसते. १ जून ते ५ ऑगस्टपर्यंत शिरूरमध्ये अवघा २७ टक्के इतका अत्यंत कमी पाऊस पडल्याने पेरणी न होणे व पेरणी झालेल्या क्षेत्रावरील पिके करपू लागल्याने यंदाचा खरीप हंगाम वाया जाण्याचे स्पष्ट संकेत दिसू लागले आहेत.


kharif Crop
Rabi Crop : पैठणमध्ये उन्हामुळे रब्बी पिके कोमेजली

यंदा पुरेसा पाऊस न झाल्याने काही शेतकऱ्यांच्या उसाची लागवड व पेरणी रखडली आहे. काही शेतकऱ्यांची पिके कोमेजून करपत आहे. काही क्षेत्र नापेर राहिले. रब्बीला पुरेसा पाऊस पडावा म्हणजे कांदा, हरभरा, ज्वारी पिके घेता येतील. खरिपात आर्थिक नुकसान सोसावे लागण्याची दाट शक्यता आहे.
- लक्ष्मण हरिभाऊ शिवले,
शेतकरी, शिवतक्रार म्हाळुंगी, ता. शिरूर

kharif Crop
Kharif Crop : तेल्हारा तालुक्यात कमी पावसामुळे पिके धोक्यात


यंदाच्या खरीप हंगामाचे अत्यंत उत्तम प्रकारे नियोजन केले होते. विविध हंगामपूर्व मोहिमा राबविल्या होत्या, परंतु ऐन हंगामात पाऊस न झाल्याने काही क्षेत्रांवर पेरण्या होऊ शकल्या नाहीत. पेरणी झालेल्या क्षेत्रावरील पिके पावसाअभावी सुकू लागली आहेत. कृषी विभागाने तत्परता दाखवत केंद्र सरकारच्या १ रुपयामध्ये पीकविमा या पंतप्रधान विमा योजनेचा मोठ्या प्रमाणात प्रचार-प्रसिद्धीसाठी गावस्तरीय कार्यशाळा आयोजित करून शेतकऱ्यांचा विमा सहभाग वाढवून पिके हेक्टरी संरक्षित केली. यासाठी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला.
- संतोष सुतार, कृषी सहायक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com