Crop Damage : राज्यात तीन लाख हेक्टरवरील पिकांना पावसाचा तडाखा

जुलैमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने पिकांना मोठा फटका
Crop Damage
Crop DamageAgrowon
Published on
Updated on

पुणेः राज्यात जूनमध्ये ओढ दिलेल्या पावसाने जुलैमध्ये मात्र चांगलाच धुमाकुळ (Heavy Rain) घातलाय. पावसानं कहर केल्यामुळे शेतकऱ्यांची दाणादाण उडाली आहे. राज्यात अति पावसामुळे ३ लाख १ हजार ४९८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान (Crop Damage) झाल्याची माहिती कृषी विभागातील (Department Of Agriculture) सूत्रांनी दिली. पावसाचा जोर असाच राहिल्यास नुकसान आणखी वाढण्याची शक्यता आहे. (Crop Damage Over Three Lack Hector Due To Heavy Rain)

Crop Damage
Nagpur Rain : नागपूर विभागात सरासरी ७५.६ मिलिमीटर पाऊस

जुलै महिन्यात पहिल्या १५ दिवसांत राज्यातील जवळपास सर्वंच जिल्ह्यांत जोरदार पाऊस झाला. या पावसामुळं या सर्वंच जिल्ह्यांत कमी अधिक प्रमाणात पिकांच नुकसान झालं. विदर्भात नुकसानीचं प्रमाण जास्त असल्याचं प्राथमिक अंदाजावरून स्पष्ट होतं. या पावसामुळं सोयाबीन, कापूस, तूर, मका, मूग, उडिद, ज्वारी, भात, ऊस, केळी, संत्रा, हळद आदी पिकांसह भाजीपाला पिकांचंही नुकसान झाल्याचं सर्वेक्षणातून समोर आले. यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक १ लाख २२ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं. तर वर्धा जिल्ह्यात जवळपास ७४ हजार हेक्टर आणि नांदेड जिल्ह्यात ३६ हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला. अमरावती जिल्ह्यातही २७ हजार हेक्टरवरील पिके बाधीत झाल्याचं स्पष्ट झाले.

Crop Damage
राज्यात पीक नुकसान ४५ लाख हेक्टरच्या पुढे

पिकांच्या नुकसानीसह अनेक ठिकाणी पुरामुळे जमीन खरडून गेली. राज्यातील १६७९ हेक्टरवरील जमीन खरडून गेल्याचं प्राथमिक अहवालात नमूद केले आहे. यात सर्वाधिक १२४९ हेक्टर क्षेत्र अमरावती जिल्ह्यातील आहे. तर १९५ हेक्टर नांदेड, यवतमाळमध्ये १४२ हेक्टर आणि नागपूर जिल्ह्यात ५८ हेक्टरवरील जमीन खरडून गेली.

राज्यात आत्तापर्यंत सोयाबीनचा पेरा सर्वाधिक झाला. ४२ लाख हेक्टर क्षेत्र सोयाबीनखाली आल्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी सुरूवातीला केलेल्या पेरण्या अति पावसामुळे वाया गेल्या आहेत. तिथे दुबार पेरणीचं संकट ओढवलं आहे. अनेक ठिकाणी पिकं पिवळी पडली आहेत. पिकापेक्षा गवत जास्त वाढलंय. मजुरीचा, तणनाशकांचा खर्च परवडणारा नाही. पाऊस सतत चालू असल्यामुळे मशागतीसाठी वाफसा मिळत नाही. सूर्यप्रकाश नसल्यामुळे पिकांची वाढ खुंटलीये. अनेक ठिकाणी जूनमध्ये समाधानकारक पाऊस पडला नाही. त्यामुळे पेरण्या उशीरा झाल्या. त्यामुळे रोपं लहान आहेत. सततच्या पावसामुळे त्यांचं नुकसान होत आहे.

अनेक ठिकाणी पाऊस थांबल्यावरही लवकर वापसा कंडिशन येण्याची चिन्हे दिसत नाहीत. चिबड शेतजमिनीत तर पाणी साचून राहिल्यामुळे मोठं नुकसान झालं आहे. अशा ठिकाणी दुबार पेरणीही करणं अवघड आहे, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे, त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. दरम्यान, नाशिक, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांत दुबार पेरणीची वेळ येणार आहे. त्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात बियाणे पुरवावेत, अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com