Solapur News सोलापूर जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या वादळी वारे, अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) आणि गारपीठीच्या (Hailstorm) नुकसानीचा फटका १०४ गावातील ३ हजार शेतकऱ्यांना बसला.
पण शासनाच्या नियमानुसार ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान (Crop Damage) झालेल्या शेतीपिकांचे महसूल आणि कृषी विभागाच्या पथकाने पंचनामे करून तयार केलेल्या संयुक्त अहवालानुसार एक हजार ७५८ हेक्टरवरील पिकांचे २ कोटी ६८ लाख ९३ हजार ९५५ रुपयांचे नुकसान झाल्याचा अहवाल शासनाकडे पाठवला आहे.
सोलापूर जिल्ह्यात गेल्या आठवड्यात १४ ते १८ मार्च दरम्यान अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. जिल्ह्यातील अनेक भागात या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले.
त्यावेळी जिल्हा प्रशासनाने तातडीने प्राथमिक माहितीवर आधारित अहवाल तयार केला. त्यात साडेचार हजार शेतकऱ्यांच्या तीन हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.
पण शासनाच्या निकषानुसार ३३ टक्कयांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांचे महसूल आणि कृषी विभागाने संयुक्त पंचनामे करण्यात आले.
तेव्हा त्यात १ हजार ७५८ हेक्टरवरील पिकांचे २ कोटी ६८ लाख ९३ हजार ९५५ रुपयांचे नुकसान झाल्याचा अहवाल तयार करण्यात आला. प्रामुख्याने त्यात खरिपातील ज्वारी, गहू, हरभरा, द्राक्ष, डाळिंब, पपई, केळी या पिकांचे नुकसान झाले.
शेतकऱ्यांचे मदतीकडे लक्ष
या आपत्तीचा पंढरपूर आणि अक्कलकोट तालुक्याला सर्वाधिक फटका बसला. त्यात ९२ शेतकऱ्यांच्या ७१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. तर बागायत पिकाखालील २००३ शेतकऱ्यांच्या ९८८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.
तर फळपिकांमध्ये ९०५ शेतकऱ्यांच्या ६९९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. आता हा अहवाल शासनाकडे पाठवण्यात आला आहे. त्याच्या मदतीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.