Palghar Rain News : पालघर जिल्ह्यात आठवडाभरापासून विविध ठिकाणी मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. त्यामुळे रब्बीची पिके (Rabi Crop), फुलशेती, फळबागा (Orchard) आणि वीटभट्ट्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे सुरू आहेत.
मार्च महिन्यात खरिपाच्या मशागतीला सुरुवात झाली होती. मात्र राब भाजणीच्या हंगामात पाऊस कोसळ्याने गवत, कवळ्या आणि पालापाचोळा हे राब भाजणीचे साहित्य भिजले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत.
वादळी पावसाने पालघर जिल्ह्यात १५ मार्चपासून सुरुवात केली आहे. जिल्ह्याच्या विविध भागात रोजच पाऊस कोसळत आहे. त्याचा मोठा परिणाम फुलशेती, फळबाग आणि रब्बी पिकांवर झाला आहे. फुलशेती, फळबागा आणि रब्बीची पिके अनेक भागांत जमीनदोस्त झाली आहेत.
तसेच जिल्ह्यातील वीटभट्ट्यांमध्ये अक्षरशः चिखल झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह वीटभट्टी व्यवसायिकांचे कंबरडे मोडले आहे. सरकारच्या आदेशानुसार शेतीच्या नुकसानीचे पंचनामे सुरू झाले आहेत.
खरिपाच्या मशागतीला ब्रेक
गेली आठवडाभरापासून विविध ठिकाणी कोसळलेल्या अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणाने खरीप हंगामाच्या मशागतीला ही ब्रेक लागला आहे. मार्च महिन्यात खरीपाच्या मशागतीला सुरुवात झाली होती. राब भाजणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू होती.
पालघर जिल्ह्यात खरिपाचे एक लाख पाच हजार हेक्टर लागवडीचे क्षेत्र आहे. यामध्ये सर्वाधिक ७५ हजार हेक्टर क्षेत्र भातपिकाचे आहे. भाताची, नागली आणि वरईचे रोपे तयार करण्यासाठी दरवर्षी पारंपरिक पद्धतीने शेतकरी राब भाजणी करतात.
त्यासाठी शेतकरी गवत, पालापाचोळा गोळा करून जमीन भाजून निघून रोपे बहरावी यासाठी शेतकऱ्यांची ही धडपड असते; पण पावसाने या सर्व कामांना फटका बसला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.