Crop Damage : नाशिक जिल्ह्यात २३ हजार हेक्टरवर पिकांची धुळधाण

कृषी विभागाने दिलेल्या नुकसानीच्या प्राथमिक माहितीनुसार, सटाणा तालुक्यात सर्वाधिक १२ हजार ६०४ हेक्टरवर नुकसान झाले आहे. ज्यामध्ये सर्वाधिक नुकसान उन्हाळ कांद्याचे झाले आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Nashik News जिल्ह्यात ७ ते १२ एप्रिल दरम्यान वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपीट (Hailstorm) झाली. त्यामुळे २३ हजार ६९८ हेक्टर क्षेत्राची धुळधाण (Crop Damage) झाली आहे. या संकटात ३६ हजार ४४२ शेतकरी नुकसानग्रस्त झाले आहेत. यामध्ये ६०० कोटींवर आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

कृषी विभागाने दिलेल्या नुकसानीच्या प्राथमिक माहितीनुसार, सटाणा तालुक्यात सर्वाधिक १२ हजार ६०४ हेक्टरवर नुकसान झाले आहे. ज्यामध्ये सर्वाधिक नुकसान उन्हाळ कांद्याचे झाले आहे. नांदगाव तालुक्यात सर्वाधिक १२,४३३ शेतकरी बाधित झाले आहेत. यासह मालेगाव, कळवण, चांदवड, निफाड, देवळा, नाशिक, सिन्नर, इगतपुरी, दिंडोरी, सुरगाणा, पेठ, येवला तालुक्याला मोठा फटका बसला आहे.

सटाणा व नांदगाव तालुक्यात उन्हाळा कांद्याचे सर्वाधिक नुकसान आहे. निफाड तालुक्यात द्राक्ष बागांचे ३३२ हेक्टरवर नुकसान आहे. भाजीपाला क्षेत्रही बाधित झाले आहे. जिल्ह्यात डाळिंब पिकाची मोठी वाताहत झाली आहे.

Crop Damage
Crop Damage In Solapur : सोलापुरात ‘वादळी’ने २६ गावातील १११.४ हेक्टर क्षेत्राचे नुकसान

नाशिक जिल्ह्यातील पीक नुकसान

पिके....क्षेत्र (हेक्टर)

कांदा...१८,३४६.४७

गहू...५३६.७०

हरभरा...१२

मका...३६७.७०

टोमॅटो...२५५.२०

बाजरी...२२१.८८

भाजीपाला व इतर...१,४५३.८०

ऊस...७

चारा पिके...३३

कांदा बीजोत्पादन...३३

इतर फळपिके...११

वेलवर्गीय फळे...३५

मोसंबी...८.२०

चिकू...८.२०

पेरू...३.२०

द्राक्ष...१,०१६.६९

आंबा...४६४

लिंबू...१३.६०

डाळिंब...८७२

Crop Damage
Crop Damage In Nagar : नगर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाहीत

तालुकानिहाय नुकसान स्थिती :

तालुका...बाधित गावे...बाधित शेतकरी

मालेगाव...२३...१,२१०

सटाणा...४६...१०,४१८

नांदगाव...५३...१२,४३३

कळवण...२५...१,११४

देवळा...६...६२९

दिंडोरी...१७...२८०

सुरगाणा...१०६...२,१४८

नाशिक...५३...१,१७५

पेठ...३०...२२९

इगतपुरी...२३...१,९६९

निफाड...४६...२,०८१

सिन्नर...२६...६३७

चांदवड...११...२,११७

येवला...२...२

एकूण...४६७...३६,४४२

पंचनाम्यानंतर येणार अंतिम चित्र

मागे झालेल्या नुकसानीचे पंचनामे जिल्हा प्रशासनाने पूर्ण केले. मात्र त्यामध्ये द्राक्ष बागांचे अनेक ठिकाणी वस्तुनिष्ठ पंचनामे झाले नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. द्राक्षमण्यांना तडे जाणे, नंतर

सड होणे असे चित्र होते. त्यामुळे नुकसान तूर्तास दिसून येत नसल्याने सात ते आठ दिवसानंतर दिसून येते. त्यामुळे प्रशासनाने वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

गारपिटीच्या तडाख्यात कांदा, टोमॅटो, मिरचीचे १०० टक्के नुकसान झाले. एकरी लाख रुपये खर्च करूनही हाती काही शिल्लक नाही. पंचनामे होतील; मात्र शेतकऱ्यांना आता सरकारने पुन्हा उभे करावे, तरच शेतकरी जगेल. भरीव मदत द्यावी.
- राजेंद्र परदेशी, शेतकरी, डांगसौंदाणे, ता. सटाणा, जि. नाशिक.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com