Crop Damage In Solapur : सोलापुरात ‘वादळी’ने २६ गावातील १११.४ हेक्टर क्षेत्राचे नुकसान

सोलापूर जिल्ह्यात ७ ते ९ एप्रिल या कालावधीत अवकाळी पाऊस, गारपीट व वादळी वाऱ्यामुळे २६ गावे बाधित झाली असून, ११९.४ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon

Solapur News : सोलापूर जिल्ह्यात ७ ते ९ एप्रिल या कालावधीत अवकाळी पाऊस, गारपीट व वादळी वाऱ्यामुळे २६ गावे बाधित झाली असून, ११९.४ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे. तसेच बाधित क्षेत्राचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Minister Radhakrishna Vikhe) यांनी दिले आहेत.

जिल्ह्यातील माळशिरस, मोहोळ, बार्शी, करमाळा, पंढरपूर आणि सांगोला तालुक्यात नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे. शासन संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी असून, संबंधित यंत्रणांनी तातडीने कामाला लागावे व सविस्तर अहवाल तयार करावा.

Crop Damage
Minister Radhakrishna Vikhe Patil : राहात्यात पीक नुकसानीची पालकमंत्र्यांकडून पाहणी

नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करावेत, असे निर्देश पालकमंत्री विखे पाटील यांनी दिले आहेत. प्राथमिक अहवालानुसार एकूण बाधित शेतकरी संख्या १५६ असून, मका, पपई, बाजरी, द्राक्षे, आंबा, केळी, दोडका, टोमॅटो ही पिके नुकसानग्रस्त झाली आहेत.

या दोन महिन्यातील शेतीला बसलेला हा दुसरा फटका आहे. गतवर्षीच्या अतिवृष्टीची नुकसानभरपाईही अजून मिळते आहे. तोवर निसर्गाने हा पुन्हा धक्का दिला आहे.

तालुकानिहाय नुकसान

कृषी विभागाने सादर केलेल्या प्राथमिक अहवालानुसार तालुका, बाधित गावांची संख्या, बाधित क्षेत्र आणि कंसात बाधित शेतकऱ्यांची संख्या अनुक्रमे पुढीलप्रमाणे : माळशिरस : १४ गावे, ८८ हेक्टर (११६) मोहोळ : २ गावे २० हेक्टर (२७), पंढरपूर : २ गावे ३.६० हेक्टर (५), सांगोला : एक गाव, ३.६० हेक्टर (१), बार्शी : ५ गावे, ३ हेक्टर (5), करमाळा : २ गावे, १.२० हेक्टर (२).

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com