Crop Damage : सव्वासात लाख हेक्टरला फटका

मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद या ६ जिल्ह्यांतील १० लाख ५९ हजार ६१२ शेतकऱ्यांच्या ७ लाख ३८ हजार ७५० हेक्टरवरील विविध शेतीपिकांचे जून ते ऑगस्ट दरम्यानच्या अतिवृष्टीमुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon

औरंगाबाद ः मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद या ६ जिल्ह्यांतील १० लाख ५९ हजार ६१२ शेतकऱ्यांच्या ७ लाख ३८ हजार ७५० हेक्टरवरील विविध शेतीपिकांचे (Crop Dmage) जून ते ऑगस्ट दरम्यानच्या अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. यासोबतच सततच्या पावसाने नांदेड वगळता सात जिल्ह्यांतील सहा लाख ९१ हजार ९२४ शेतकऱ्यांच्या ४ लाख ३९ हजार ६२० हेक्टरला दणका बसला असून, गोगलगायींनी (Snail Outbreak) ७२ हजार ४९१ हेक्टरवरील पिके फस्त केली आहे.

Crop Damage
Crop Damage : ‘जणू आभाळ फाटलं, अतिवृष्टीने ना पिके वाचली ना शेती’

यंदा मराठवाड्यातील पिकांची अवस्था बीकटच आहे. पाऊस पडत असला तरी काही ठिकाणी अपेक्षेच्या पुढे जाऊन तर काही ठिकाणी नुसती प्रतीक्षा असा पावसाचा लहरीपणा शेतकऱ्यांना अनुभवायला येतो आहे. जून ते जुलैदरम्यान सततच्या पावसाने पिकाची वाढ खुंटल्याने त्याचा थेट उत्पादनावर परिणाम होणार आहे. त्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यानंतर पावसाने मारलेली दडी त्यामुळे पिकांना बसलेला शॉक उत्पादनात घट करणार असे शेतकरी सांगतात. आता आपल्या लहरी स्वभावानुसार पाऊस पडत असल्याने अनेक भागात पिकांना आवश्यक त्या वेळी पाऊस न मिळाल्याने पिकांची वाताहत कायमच आहे.

Crop Damage
Crop Damage Survey : पुणे जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे पंचनामे होणार

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी शासन नियमानुसार व जाहीर केल्याप्रमाणे मदत देते. परंतु अनुभव पाहता सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचा शासन दरबारी विचार होईल का हा खरा प्रश्‍न आहे. शिवाय प्रशासन स्तरावरून शासनाला ३३ टक्क्यांपेक्षा जास्त बाधित क्षेत्राची माहिती पुरवण्यात आली असली तरी घोषित केल्याप्रमाणे शासन अडचणीतील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी किती तत्परता दाखवते याकडे शेतकऱ्यांची लक्ष लागले आहे.

१००८ कोटी ३१ लाख निधी अपेक्षित

औरंगाबाद विभागीय आयुक्तांकडून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी १००८ कोटी ३१ लाख निधी अपेक्षित असल्याचे कळविण्यात आले आहे. याशिवाय सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीसाठी ५९९ कोटी ७ लाख ९० हजार रुपये, तर गोगलगायींमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी ९८ कोटी ५८ लाख ८ हजार रुपये निधी अपेक्षित असल्याचे कळविण्यात आले आहे. याशिवाय खरडून वाहून गेलेल्या शेतजमिनीच्या नुकसान भरपाईसाठी ही निधीची मागणी करण्यात आली आहे.

सततच्या पावसाने

झालेले नुकसान (हेक्टरमध्ये)

जिल्हा शेतकरी क्षेत्र

औरंगाबाद १६४१० १२६७९

जालना ११५० ६७८

परभणी ४४८६ २५४५.२५

हिंगोली १३९८०० ९६६७७

बीड १६० ४८.८०

लातूर ३७४६६० २१३२५१

उस्मानाबाद १५५२५८ ११३७४१

अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान (हेक्टरमध्ये)

जिल्हा शेतकरी क्षेत्र

जालना ६८९८ २३११.७९

परभणी १७५७ ११७९

हिंगोली १४१८१८ ११३६२०

नांदेड ७३६३८९ ५२७४९१

लातूर ५१७७३ ७४२५.३७

उस्मानाबाद ८०९७७ ६७२३.२०

गोगलगायीमुळे झालेली नुकसान

जिल्हा शेतकरी क्षेत्र

बीड १२९५९ ३८२२.३५

लातूर १०५६३६ ६८३८५

उस्मानाबाद ४०१ २८३.८३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com