Crab Farming : कमी जागेत खेकडापालन, संवर्धन शक्य ः डॉ. सावंत

किचन गार्डनप्रमाणेच आपण कमी जागेत खेकडा संवर्धन (व्हर्टिकल क्रॅब फार्मिंग) गॅलरीत, टेरेसवर, परस बागेत करू शकतो.
Crab Farming
Crab FarmingAgrowon
Published on
Updated on

रत्नागिरी : किचन गार्डनप्रमाणेच (Kitchen Garden) आपण कमी जागेत खेकडा संवर्धन (Crab Conservation) (व्हर्टिकल क्रॅब फार्मिंग) (Crab Farming) गॅलरीत, टेरेसवर, परस बागेत करू शकतो. महिला बचत गट, तरुण बेरोजगार तसेच मच्छीमार बांधवांना हे वरदान ठरेल, असे प्रतिपादन कोकण कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण विभागाचे संचालक डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

भविष्यातील कार्यक्रमांसाठी गोवा कृषी विज्ञान केंद्राशी कोकण कृषी विद्यापीठाचा सामंजस्य करार करण्याची इच्छा डॉ. सावंत यांनी व्यक्त केली. कोकण कृषी विद्यापीठाची सर्वच केंद्रे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची परंपरा उत्कृष्ट पद्धतीने सांभाळत असल्याबद्दल समाधानही त्यांनी व्यक्त केले.

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात बंदिस्त खेकडापालन संच हाताळणी आणि व्यवस्थापन या विषयावर तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोप कार्यक्रमात डॉ. सावंत बोलत होते. कोकण कृषी विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

Crab Farming
Fish Farming : माशांना होणाऱ्या आजारांवर उपचार

प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र आणि प्रशिक्षण पुस्तिका देण्यात आली. कृषी विज्ञान केंद्राचे (गोवा) डॉ. हृषिकेश पवार यांनी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने गोव्यात खेकडा पालन प्रशिक्षण आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली. गोवा मत्स्य व्यवसाय विभागातील मत्स्य तांत्रिक श्री. रायकर यांनी यांनीसुद्धा या प्रकारच्या प्रशिक्षण कार्यक्रमाबाबत सूचना केली.

पुणे येथील प्रशिक्षणार्थी कमलेश काकडे यांनी खेकड्यांच्या संवर्धनाबाबत प्रशिक्षण हे फक्त खेकडा प्रकल्प, सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र हे एकमेव केंद्र देत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

Crab Farming
Fish Farming : शेतकऱ्यांना मिळणार पशू, मत्सपालनाचे डिजिटल धडे

संशोधन केंद्राचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. आसिफ पागारकर यांनी पहिल्या दिवशी प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्‍घाटन केले. डॉ. पागारकर यांनी खेकडे संवर्धन अत्याधुनिक संच पद्धतीमध्ये खेकडेपालन हे कमी जागेत व कमी पाण्यात केले जात असल्यामुळे हा व्यवसाय सुरू करण्यास चांगली संधी आहे, असे सांगितले.

परिपूर्ण मार्गदर्शन

प्रशिक्षणात खेकडा पालन सद्यःस्थिती व संधी, खेकड्यांच्या जातींची ओळख व जीवनचक्र, जिवंत खेकडा पालन संच व हाताळणी, पाण्याचे गुणधर्म आणि व्यवस्थापन, खाद्य व्यवस्थापन, रोग व्यवस्थापन, अर्थशास्त्र व प्रकल्प अहवाल कसा तयार करावा, खेकडा काढणी व काढणी पश्चात काळजी, विक्री व्यवस्थापन या विषयावर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. व्यावसायिक सातपाटी येथील आनंद तरे व उरण येथील जगदीश पाटील यांनी ऑनलाइन माध्यमातून अनुभव कथन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com