Sahakar Melava : औरंगाबादमध्ये शुक्रवारी सहकार मेळावा

शेतकऱ्यांची देणी, कामगारांच्या थकीत वेतनावर होणार चर्चा
Sahakar Melava
Sahakar MelavaAgrowon

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य शेतकरी कामगार महासंघातर्फे (Maharashtra Rajya Kamgar Mahasangh) राज्यातील सहकार चळवळ वाचविण्यासाठी औरंगाबाद येथे शुक्रवारी (ता. २८) सहकार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ॲड. सतीष तळेकर (Ad. Satish Talekar) यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा होईल, असे महासंघाकडून कळविण्यात आले आहे.

Sahakar Melava
Jalgaon ZP : अध्‍यक्षपद १८ वर्षानंतर सर्वसाधारणसाठी राखीव

महासंघातर्फे सह्याद्री लॉन्स (पटेल लॉन्स), बीड बायपास रस्ता, कमल नयन बजाज हॉस्पिटल जवळ शुक्रवारी दुपारी १२ वाजता हा सहकार मेळावा होत आहे. माजी आमदार माणिकराव जाधव या मेळाव्याचे निमंत्रक आहेत. राज्यातील ४९ सहकारी साखर कारखान्यांवर राजकारणी लोकांनी कब्जा केला आहे.

२० कारखाने कब्जात घेण्याच्या तयारीत आहेत. ३६ सहकारी साखर कारखाने गेल्या १५ ते २० वर्षांपासून बंद ठेवले आहेत. शेतकरी व कामगारांना बेरोजगार केले आहे. कामगारांचे थकीत वेतन व सेवानिवृत्तीचे लाभ दिले जात नाहीत.

यामुळे शेतकरी व कामगार संकटात सापडले आहेत. यास वाचा फोडण्यासाठी व शासनाला जाब विचारण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन केले आहे. शेतकरी व कामगारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन माजी आमदार विक्रम सावंत, धर्माजी सोनकवडे, मनोहर पटवारी आदींनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com