Agriculture Research
Agriculture Research Agrowon

Agriculture Research : शेती संशोधनात अनुसंधान परिषदेचे योगदान मोठे

ICAR : १९७२ च्या तुलनेत भारताची लोकसंख्या आज तिप्पट झाली. केवळ भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या योगदानामुळे भारत आज जगात ताठ मानेने उभा आहे.
Published on

Jalna News : शेती संशोधनात भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे योगदान मोठे असून हे संशोधन देशाच्या विविध भागात वेगवेगळ्या हवामान परिस्थितीत तपासून पाहिले जाते, त्यामुळे ते दर्जेदार व टिकाऊ असते, असे प्रतिपादन मराठवाडा शेती सहाय्य मंडळाचे विश्वस्त व कृषी विज्ञान केंद्राचे प्रकल्प संचालक विजय बोराडे यांनी केले.

खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या ९५ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित तीन दिवसीय तंत्रज्ञान दिवस व कृषी प्रदर्शनीच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मराठवाडा शेती सहाय्य मंडळाचे विश्वस्त कृषिभूषण भगवानराव काळे होते.

Agriculture Research
Agriculture Research : शेतकरी केंद्रीत हवे संशोधन

कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. एस. व्ही. सोनुने शेतकरी प्रतिनिधी रामदास कुरळकर आणि रेखाताई उपासे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. श्री. बोराडे म्हणाले, की भारतीय कृषी अनुसंधान परिषदेची स्थापना इंग्रजांच्या काळात झालेली असून इंग्रजांनी त्या काळात माती आणि पाणी संवर्धनाचा स्वतंत्र विभाग शंभर वर्षांपूर्वी सुरू केला.

Agriculture Research
Agriculture Research : शेतीतील प्रयोगांची दखल घेऊन संशोधन व्हावे

आजही माती आणि पाण्याचे संवर्धन हा महत्त्वाचा विषय आहे. बदलत्या हवामानानुसार शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांनी अवलंब करावा, शेतकरी जगला पाहिजेत यासाठी यापुढे शासनाला काम करावे लागेल.

श्री. काळे म्हणाले, की १९७२ च्या तुलनेत भारताची लोकसंख्या आज तिप्पट झाली. केवळ भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या योगदानामुळे भारत आज जगात ताठ मानेने उभा आहे. केव्हीकेचे प्रमुख सोनुने यांनी कार्यक्रमाची पार्श्वभूमी विषद केली.

दुसऱ्या सत्रात मोसंबी लागवडीची पूर्वतयारी आणि फळ गळ व्यवस्थापन या विषयावर कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ सुनील कळम आणि राहुल चौधरी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

या प्रदर्शनात कृषी विज्ञान केंद्राच्या विविध विभागांमार्फत बियाणे, कलमे, रोपे, अन्न प्रक्रिया पदार्थ, किसान ड्रोन, कीड रोग व्यवस्थापन या विषयावरील तंत्रज्ञान प्रदर्शित करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात पीक प्रात्यक्षिक निविष्ठांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय मिटकरी यांनी तर आभार प्रदर्शन श्रीमती संगीता कऱ्हाळे यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com