Agriculture Research : शेतीतील प्रयोगांची दखल घेऊन संशोधन व्हावे

New Experiments in Agriculture : शेतकरी नव नवीन प्रयोग करत आहेत. त्याची दखल घेऊन त्यावर संशोधन करणे आवश्यक असल्याचे मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी व्यक्त केले.
Dr. Indra Mani
Dr. Indra ManiAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : शेतकरी नव नवीन प्रयोग करत आहेत. त्याची दखल घेऊन त्यावर संशोधन करणे आवश्यक असल्याचे मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी व्यक्त केले.

स्थानिक राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाच्या सभागृहात सोमवारी (ता. १२) आयोजित विभागीय कृषी विस्तार व सल्लागार समितीच्या बैठकीत कुलगुरू बोलत होते.

डॉ. इंद्र मणी म्हणाले, की विद्यापीठाने विकसित केलेल्या बाजरीचे बाजरीचे जैव संपृक्त वाण एचबी १२०० व एचबी १२६९ व ज्वारी च परभणी शक्ती वाण शेतकरी बंधुंपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. विद्यापीठात निर्माण झालेले संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारची संरचना आहे, अशा प्रकारे संरचना देशात नाही.

या माध्यमाद्वारे विविध स्तरावर आढावा घेतला जात असून त्याद्वारे शेतकऱ्यांना तत्पर सेवा देण्याचे दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. स्थानिक गरजेनुसार संशोधन करून ते शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्यास बदलत्या हवामानास तोंड देणे शक्य होईल. मजुरांवरील खर्च कमी करण्याच्या दृष्टीने यांत्रिकीकरणाचा वापर करणे गरजेचे आहे.

Dr. Indra Mani
Farmers Issue : राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्‍न मार्गी लावा

पीक पद्धतीत बदल करून पौष्टिक धान्य, गळीत धान्य व कडधान्य या पिकाचा समावेश करून देशाला स्वयंपूर्ण करणे गरजेचे आहे. ठिबक सिंचन, तुषार सिंचन यांसारख्या आधुनिक पद्धतीचा अवलंब करून संरक्षित पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे असल्याचे डॉ. इंद्र मणी म्हणाले.

कृषी संशोधन व विकास समिती बैठकीत मंजूर झालेल्या शिफारशींचे सादरीकरण विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी या वेळी केले. या शिफारशी येणाऱ्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना माहिती होण्याच्या दृष्टीने कृषी विभागाच्या साह्याने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल. त्याचप्रमाणे मागील खरीप हंगाममध्ये शेतकऱ्यांच्या शेतावर उद्भवलेल्या विविध प्रत्याभरण याविषयी सादरीकरण विभागीय कृषी सहसंचालक व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले.

त्या प्रत्येक प्रत्याभरण आधारित शास्त्रज्ञतर्फे विवेचन करण्यात आले व काही प्रत्याभरणवर संशोधन करण्याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे कृषी विज्ञान केंद्र व विस्तारकार्य अधिकारी यांच्यामार्फत राबवलेल्या विविध विस्तार कार्याची व प्रत्याभरण याचे सादरीकरण करण्यात आले.

या वेळी संचालक संशोधन डॉ दत्तप्रसाद वासकर, संचालक विस्तार शिक्षण डॉ. देवराव देवसरकर यांनीही मार्गदर्शन केले. प्रस्ताविक सहयोगी संचालक संशोधन डॉ. सूर्यकांत पवार यांनी तर सूत्रसंचालन डॉ. शीतल कांबळे यांनी केले. बाजरी उत्पादक शेतकरी सुभाष सूर्यवंशी व श्री पवार (खंडाळा, ता. वैजापूर) यांचा तसेच बदनापूरच्या कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. डी. के. पाटील यांचा उत्कृष्ट संशोधक म्हणून सत्कार करण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com