Flooding In Congo : काँगोतील महापूरामुळे ४०० हून अधिक लोकांचा मृत्यू; हजारो लोक बेघर

Natural Calamities : काँगोमध्ये आलेल्या महापूरामुळे ४०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण बेपत्ता झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.
flood in Congo
flood in Congoagrowon
Published on: 
Updated on: 

Congo Flood Update : मध्य आफ्रिकेतील काँगो देशामध्ये गेल्या आठवड्यात  झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे महापूर आणि भूस्खलनाच्या घटना घडल्या. यात ४०० हून अधिक लोक मरण पावले आहेत. या पुरामुळे अनेक जण बेपत्ता झाले होते.

या शोध मोहिमेत अनेकांचा जीव वाचवण्यात यश आले. या पुराचा दक्षिण किवूमधील कालेहे प्रदेश आणि विशेषत: बुशुशु आणि न्यामुकुबी गावांना फटका बसला.  पीडितांसाठी सरकारकडून मदत कार्य सुरूच आहे.

flood in Congo
flood in Africa : काँगोच्या पुरात १७६ मृत्यू, 100 हून अधिक लोक बेपत्ता

काँगोमध्ये गुरुवार दि. ४ रोजी झालेल्या मुसळधार पाऊस झाला. तसेच अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या. दक्षिण किवूमधील नद्यांना पूर आला. नदीमधील पुराचे पाणी कालेहे प्रदेश आणि विशेषत: बुशुशु आणि न्यामुकुबी गावांमध्ये शिरले. पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने अनेकांची घर वाहून गेली. अनेकांची घरं चिखलात गाढली गेला.

flood in Congo
Heavy Radish : ४५ किलोपेक्षा जास्त वजनाचा वजनदार मुळा

मुसळधार पाऊस थांबल्यानंतर पुराचे पाणी ओसरण्यास दोन ते तीन झाले आहेत. यामध्ये अनेक जण बेपत्ता झाले होते.  वाचलेले लोक त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना चिखलात शोधत होते. रेस्क्यु टीमकडून बचाव कार्य सुरू करण्यात आले. यामध्ये जवळपास 3000 कुटुंबे बेघर झाले होते. अनेक जणांचा पुराच्या पाण्यात वाहून मृत्यू झाला. तर काहींचा चिखलाखाली गाढले गेलेल्याने मृत्यू आतापर्यंत ४०० लोकांचा मृत्यू झाला आहे.

शोध मोहिम सुरूच असून चिखलाच्या ढिगाऱ्याखालून अनेकांचा जीव वाचविण्यात आला आहे. तर काही मृतदेह जवळच्या किवू तलावातून बाहेर काढण्यात आले. या महापूरामुळे सुमारे १२०० घरं उद्धवस्थ झाली आहेत. युनायटेड ऑफिस फॉर द कोऑर्डिनेशन ऑफ ह्युमॅनिटेरियन अफेयर्सने सांगितले. काँगोमध्ये सोमवारी पुरामुळे बळी पडलेल्यांसाठी शोक दिवस पाळण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.