Heavy Radish : ४५ किलोपेक्षा जास्त वजनाचा वजनदार मुळा

मुळा कच्‍चा खातात किंवा त्‍याची शिजवून भाजी करतात. मुळ्याची कोशिंबीर किंवा पराठेही करतात. मुळ्यात प्रथिने, कर्बोदके,फॉस्फरस आणि लोह असते. मुळा उष्ण गुणधर्माचा आहे.
Heavy Radish
Heavy Radish Agrowon
Published on
Updated on

मुळा (Radish) कच्‍चा खातात किंवा त्‍याची शिजवून भाजी करतात. मुळ्याची कोशिंबीर किंवा पराठेही करतात. मुळ्यात प्रथिने, कर्बोदके,फॉस्फरस आणि लोह असते. मुळा उष्ण गुणधर्माचा आहे. औषधी गुणधर्मामुळे मुळ्याला आयुर्वेदातही महत्व आहे. साधारण एका सामान्य मुळ्याचं वजन ७५ ते 200 ग्रॅम पर्यंत भरतं. मात्र तब्बल ४५ किलोपेक्षा जास्त वजनाचा मुळा तुम्ही पाहिलाय का? अशा वजनदार मुळ्याच उत्पादन (Radish Production) घेणं शक्य आहे का?  तर जपान मधील एका सेंद्रिय खत उत्पादक कंपनीने अशा भल्या मोठ्या मुळ्याचं उत्पादन घेतलयं.

मूळवर्गीय भाजीपाला पिकांमध्‍ये मुळा हे थंड हवामानातील पीक असून त्‍याची लागवड प्रामुख्‍याने रब्‍बी हंगामात केली जाते. मात्र उष्‍ण हवामानात चांगल्‍या वाढू शकणा-या मुळयांच्‍या जाती विकसित करण्‍यात आल्‍यामुळे मुळयाचे पीक जवळ जवळ वर्षभर घेता येते. मुळयाची लागवड केल्‍यानंतर जातीनुसार ४० ते ५५ दिवसांनी मुळे काढणीसाठी तयार होतात. 

Heavy Radish
Rabi Crop Loan : रब्बीत शेतकऱ्यांना ४५ टक्के कर्जवाटप

जपान मधील हिरोशिमा शहरातील मांडा फर्मेंटेशन लिमिटेड कंपनीने ४५ किलोपेक्षा जास्त वजनाच्या मुळ्याचं उत्पादन घेतलं आहे. ही कंपनी वनस्पतीजन्य घटक आंबवून विशिष्ट प्रकारची खते तयार करते. या कंपनीने विकसित केलेल्या तंत्राने दरवर्षी अशाप्रकारच्या वजनदार मुळ्याचं उत्पादन घेतलं जातं.

Heavy Radish
Red Radish : लाल मुळ्याचे फायदे काय आहेत?

सामान्य मुळ्याची काढणी तीन महिन्यात होते. मात्र या या विशिष्ट मुळ्याची काढणी ६ महिन्यांनंतर केली जाते. मुळ्याचा परिघ ११३ सेंमी असून लांबी ८० सेंमी आहे. तर वजन तब्बल ४५.८६५ किलो भरले आहे. त्यामुळे या मुळ्याची नोंद  सर्वात वजनदार मुळा म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com