Farmer CIBIL : पीककर्जासाठी सीबिल स्कोरची अट रद्द करावी

Crop Loan : सीबिल स्कोरची अट रद्द करावी, आदी मागण्यांसाठी भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चातर्फे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडे निवेदन देण्यात आले.
Farmer CIBIL
Farmer CIBILAgrowon

Parbhani News : जिल्ह्यातील बँकांकडून शेतकऱ्यांची पीककर्जासाठी होत असलेली अडवणूक थांबवावी. सीबिल स्कोरची अट रद्द करावी, आदी मागण्यांसाठी भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चातर्फे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडे निवेदन देण्यात आले.

Farmer CIBIL
Farmer CIBIL : पीककर्जासाठी शेतकऱ्यांना 'सीबील'ची अट घालू नका

राष्ट्रीयीकृत बँकांकडून शेतकऱ्यांना पीककर्ज देताना अडवणूक केली जात आहे. पंतप्रधान घरकुल योजनेतील लाभार्थ्यांच्या अनुदानाचा हप्ता, पीएम किसान अनुदान, मनरेगा अंतर्गत मजुरीची रक्कम कर्ज खात्यात वळती केली जात आहे.

बँकांच्या धोरणांमुळे शासनाचा उद्देश असफल होत आहे. जिल्ह्यातील सर्व बँकांना या बाबतीत योग्य मार्गदर्शन करून हे प्रकार थांबवावेत, अशी मागणी भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विलास बाबर, राजेभाऊ राठोड, वामनराव दळवे, विठ्ठलराव दळवे यांनी केली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com