Farmer CIBIL : पीककर्जासाठी शेतकऱ्यांना 'सीबील'ची अट घालू नका

Team Agrowon

खरीप हंगाम

खरीप हंगामाच्या तयारीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. शेतकऱ्यांकडून मशागतीच्या कामाना वेग आला आहे.

Farmer CIBIL | Agrowon

निविष्ठा खेरदी

खरीप हंगामातील बियाणे, खते आणि निविष्ठांच्या खेरदीसाठी शेतकरी पैशांची जुळवाजु करत आहेत.

Farmer CIBIL | Agrowon

पीककर्ज

पीककर्जासाठी शेतकऱ्यांच्या बँकेच्या दारातील फेऱ्याही वाढल्या आहेत. पण अनेक बँका सीबील स्कोरचे कारण देत पीककर्ज देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत.

Farmer CIBIL | Agrowon

सीबील अट

या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पीककर्ज देताना सीबील स्कोरची न घालण्याचे आदेश राज्यस्तरीय बँकर्स कमिटीने (एसएलबीसी) सर्वच राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांना दिले आहेत.

Farmer CIBIL | Agrowon

शेतकऱ्यांची अडवणूक

सीबीलच्या आडून शेतकऱ्यांची अडवणूक करू नये, असेही एसएलबीसीने स्पष्ट केले आहे.

Farmer CIBIL | Agrowon

देवेंद्र फडणवीस

दरम्यान, राज्यस्तरीय खरीप हंगाम आढावा बैठकीत शेतकऱ्यांच्या सीबीलच्या मुद्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संताप व्यक्त केला होता.

Devendra Fadnavis | Agrowon

बँकांवर गुन्हे

शेतकऱ्यांना पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेशही फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Farmer CIBIl | Agrowon
Bullcok Cart Race | Agrowon