Jellyfish Crisis : जेलीफिशच्या संकटाने मच्छीमारांमध्ये चिंता

अलीकडे घातक मानले जाणारे जेलीफिश समुद्रकिनारी आणि मच्छीमारांच्या जाळ्यामध्ये अडकत आहेत. त्यामुळे त्याचा मोठा परिणाम मासेमारीवर होत आहे.
 Jellyfish Crisis |  Jellyfish | Fisherman
Jellyfish Crisis | Jellyfish | FishermanAgrowon

सिंधुदुर्गनगरी ः अलीकडे घातक मानले जाणारे जेलीफिश (Jellyfish) समुद्रकिनारी आणि मच्छीमारांच्या (Fisherman) जाळ्यामध्ये अडकत आहेत. त्यामुळे त्याचा मोठा परिणाम मासेमारीवर होत आहे. जाळ्यात अडकलेला जेलीफिश काढताना त्याचा हाताशी संपर्क आल्यास खाज उठणे, जळजळ होणे असे प्रकार होत आहेत. त्यामुळे मच्छीमारांमध्ये एकप्रकारे भितीचे वातावरण आहे.

 Jellyfish Crisis |  Jellyfish | Fisherman
Fish Drought : मत्स्यदृष्काळ जाहीर करा

वातावरणातील सतत होणाऱ्या बदलामुळे देखील मासेमारीवर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे मच्छीमार संकटात होते. परंतु जेलीफिशच्या प्रमाणामुळे जाळ्यात मासे मिळण्याचे प्रमाण देखील कमी झाले आहे. त्यामुळे मच्छीमारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

 Jellyfish Crisis |  Jellyfish | Fisherman
Fish Market : सुक्या मासळीचा भाव वधारला

दरम्यान, पर्ससीन आणि हायस्पीड एलईडीद्‌वारे अनधिकृतपणे होणाऱ्या मासेमारीला त्रासलेल्या जिल्ह्यातील मच्छीमार सध्या जेलीफिशच्या संकटाने ग्रासले आहेत. त्यामुळे या नव्या संकटाला तोंड कसे द्यावे, या चिंतेत मच्छीमार आहेत.

कोकणाला मोठी किनारपट्टी लाभली आहे. किनारपट्टीच्या हजारो मच्छीमारांचा मासेमारी हा प्रमुख व्यवसाय आहे. हजारो लोकांचा उदरनिर्वाह मासेमारीवर अवलंबून आहे. रापण, पारंपरिक, स्पीड बोटी आदीचा वापर करून मासेमारी केली जाते. गेल्या काही वर्षात हायस्पीड बोटी, पर्ससीन आणि एलईडीद्‌वारे अनधिकृतपणे मासेमारी केली जाते. या पद्धतीमुळे पारंपरिक मासेमारी धोक्यात आली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com