Paddy Cultivation : रत्नागिरीत ३४ हजार हेक्टरवर भात लावण्या पूर्ण

Ratnagiri Paddy Cultivation : मॉन्सूनचे उशिराने झालेले आगमन आणि जुलैतही अनियमित पडत असलेला पाऊस, यामुळे भात लावण्यांची कामे संथ गतीने सुरू आहेत.
Paddy Cultivation
Paddy CultivationAgrowon

Paddy Crop : रत्नागिरी ः मॉन्सूनचे उशिराने झालेले आगमन आणि जुलैतही अनियमित पडत असलेला पाऊस, यामुळे भात लावण्यांची कामे संथ गतीने सुरू आहेत. आतापर्यंत ३४ हजार २३८ हेक्टर क्षेत्रावरील लावण्या म्हणजचे एकूण क्षेत्राच्या ५० टक्के भात लावण्या पूर्ण झाल्या आहेत.

जिल्ह्यात ६८ हजार ५५० हेक्टर क्षेत्रावर भात तर १० हजार ७३५ हेक्टर क्षेत्रावर नाचणी लागवड करण्यात येते. जिल्ह्यात भाताची पेरणी रोहिणी, मृग नक्षत्रात केली जाते. रोपे २० ते २१ दिवसांची झाल्यानंतर ती काढून पुनर्लागवड करण्याची पद्धत आहे. एकतर पाऊस उशिरा सुरू झाल्याने पेरण्या रखडल्या. जूनअखेरीस पाऊस दाखल झाल्यानंतर पेरण्यांना गती आली. मात्र, नंतर पावसाने दडी मारल्याने लावण्या रखडल्या. आतापर्यंत जिल्ह्यात ५० टक्के लावण्या झाल्या आहेत. पावसाचे सातत्य नसल्यामुळे लागवडीसाठी पाण्याची कमतरता भासत आहे.

काही ठिकाणी पंपाच्या, पाटाच्या पाण्यावर लागवड केली जात आहे. शेतीच्या कामासाठी मजुरांची समस्या असल्याने सामूहिक लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. सामूहिक लागवडीमुळे भात लागवडीची कामे वेळेवर पूर्ण करण्याकडे कल आहे. नांगरणीसाठी वेळ, श्रम, पैशाची बचत करताना पॉवर टिलरचा वापर सुरू आहे. भाडे तत्त्वावर पॉवर टिलर उपलब्ध होत असल्याने नांगरणी सुलभ झाली आहे.

Paddy Cultivation
Paddy Procurement : रत्नागिरीत अडीच हजार क्विंटल भात खरेदी

जिल्ह्यात सर्वाधिक रत्नागिरी तालुक्यात ५९४० तर संगमेश्‍वर तालुक्यात ५ हजार ५२० हेक्टरवर लावण्या झाल्या आहेत. दापोलीत ३०८३ हेक्टरवर, खेड २८६०, गुहागर २५०३, मंडणगड २४३८, राजापूर ५४५८, लांजा तालुक्यात २६१० हेक्टरवर लावण्या झाल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com