Paddy Procurement : रत्नागिरीत अडीच हजार क्विंटल भात खरेदी

लहरी पाऊस, मनुष्यबळाची कमतरता, मजुरी आणि यांत्रिक साधनांचे वाढते दर आदींमुळे भातशेती तोट्यात असल्याचे बोलले जाते.
Paddy Procurement
Paddy ProcurementAgrowon

Agriculture Market News ाजापूर, जि. रत्नागिरी ः तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरेदी-विक्री संघाकडे यावर्षी २ हजार ८३६ क्विंटल भात (Paddy) दिला. भात खरेदीच्या (Paddy Procurement) माध्यमातून यावर्षी ५७ लाख ८५ हजार ४४० रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती राजापूर खरेदी-विक्री संघाचे व्यवस्थापक दीपक कानविंदे यांनी दिली. हा मोबदला शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाल्याचेही त्यांनी सांगितले.

Paddy Procurement
Paddy Procurement : धान, भरडधान्य खरेदी बंद करण्यास संचालकांचा विरोध

लहरी पाऊस, मनुष्यबळाची कमतरता, मजुरी आणि यांत्रिक साधनांचे वाढते दर आदींमुळे भातशेती तोट्यात असल्याचे बोलले जाते. पावसाळी हंगामामध्ये राबूनही त्या तुलनेमध्ये उत्पन्न मिळत नसल्याने अनेकांचा भातशेतीकडे कल कमी झाला आहे.

Paddy Procurement
Paddy Procurement : सिंधुदुर्गात ९९ हजार क्विंटल भातखरेदी

त्यातून, यापूर्वी हिरवेगार असलेले भातशेतीचे मळे अलीकडे पडीक असल्याचे चित्र दिसत आहे. भातशेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी भातशेती बंद करून रेशन दुकान तसेच बाजारपेठेतून तांदूळ खरेदीला प्राधान्य दिले आहे. अशा स्थितीतही काही शेतकरी आजही भातशेती करतानाचे आश्‍वासक चित्र आहे.

दृष्टिक्षेपात भातखरेदी

केंद्र शेतकरी संख्या भातखरेदी (क्विंटल) रक्कम

राजापूर ४२ १२६५.६० २५,८१,८२४

पाचल ६७ १५७०.४० ३२,०३,६१६

एकूण १०९ २८३६ ५७,८५,४४०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com