G-20 : सुरू असलेली कामे तीन आठवड्यात पूर्ण करा

जी-20 बैठकांच्या निमित्ताने सुरू असलेली कामे तीन आठवड्यात पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.
G-20
G-20Agrowon

औरंगाबाद ः G-20 : औरंगाबाद शहरात पुढील महिन्यात होणाऱ्या जी-20 परिषदेच्या (G-20 Council) बैठका व कार्यक्रमाच्या पूर्वतयारीबाबत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर (Departmental Commissioner Sunil Kendrekar) यांनी मंगळवारी (ता. 17) आढावा घेतला. जी-20 बैठकांच्या निमित्ताने सुरू असलेली कामे तीन आठवड्यात पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयात जी-20 परिषदेच्या पूर्वतयारीबाबत आयोजित बैठकीला जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, मनपा प्रशासक तथा आयुक्त डॉ.अभिजित चौधरी, जिल्हा पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया आदी उपस्थित होते.

श्री केंद्रेकर म्हणाले, जी-20 राष्ट्रसमुहाच्या परिषदेचे आयोजनाने औरंगाबादकरांना एक संधी मिळाली आहे. त्यासाठी सुक्ष्म नियोजन महत्त्वाचे आहे.

जी-20 बैठकांमध्ये सहभागी प्रतिनिधींच्या प्रवासाच्या मार्गावरील तसेच शहरातील संपूर्ण रस्ते, रस्त्यांची स्वच्छता, रस्ता दुरुस्ती, रस्ता दुभाजकांची कामे, उड्डाणपुलांवरील रस्ता दुभाजक, झाडांची निगा तसेच परिषदेच्या निमित्ताने आवश्यक ती सर्व कामे तीन आठवड्याच्या आत पूर्ण करा, अशा सूचना त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.

कामाबाबत कोणत्याही प्रकारे हयगय सहन केली जाणार नाही असेही त्यांनी सांगितले. औरंगाबाद शहरात या परिषदेच्या निमित्ताने येणाऱ्या अतिथीचे स्वागत, बैठकांच्या वेळी वाहतूक व्यवस्था, आपले शहर स्वच्छ व सुंदर राखून जगातील प्रमुख देशांच्या प्रतिनिधींच्या स्वागतासाठी सज्ज व्हावे.

आपण सर्व मिळून या परिषदेच्या आयोजनात सहभागी होऊया, असे आवाहनही त्यांनी केले.

G-20
G-20 Conference : ‘जी-२०’निमित्त नागपूरचे ब्रँडिंग जागतिक दर्जाचे करा

जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी औरंगाबाद येथे होणाऱ्या जी-20 परिषदेच्या नियोजनाविषयी तसेच सुरू असलेल्या कामकाजाविषयी माहिती दिली. महानगरपालिका आयुक्त श्री.चौधरी यांनीही जी-20 संदर्भात सुरू असलेल्या कामकाजाबाबत माहिती दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com