अंगणवाडी सेविकांच्या समस्या सोडविण्यास कटिबद्ध

महिला व बाल विकास विभाग आणि पंचायत समिती इंदापूर व एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प १ व २ इंदापूर यांचे संयुक्त विद्यमाने इंदापूर तालुक्यात ‘पोषण अभियान’ या कार्यक्रमाचा प्रारंभ आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते करण्यात आला.
Anganwadi Workers
Anganwadi WorkersAgrowon

इंदापूर (जि. पुणे) ः अंगणवाडी सेविका (Anganwadi Worker) यांनी कोरोना (Corona) काळात अतिशय चांगले काम केले. तसेच अंगणवाडी सेविका समाजातील तळागाळातील लोकांसाठी कार्य करणारा गट आहे. त्यांना काही अडचणी (Anganwadi Workers Issue) असतील तर त्यांचे निवारण करण्यासाठी मी सदैव त्यांच्या पाठीशी राहीन, असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रेय भरणे (Dattatray Bharane) यांनी केले.

Anganwadi Workers
Agriculture Technology : विद्यापीठाचे तंत्रज्ञान वापरून उत्पादन वाढवावे

महिला व बाल विकास विभाग आणि पंचायत समिती इंदापूर व एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प १ व २ इंदापूर यांचे संयुक्त विद्यमाने इंदापूर तालुक्यात ‘पोषण अभियान’ या कार्यक्रमाचा प्रारंभ आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी भरणे बोलत होते. या वेळी गट विकास अधिकारी विजयकुमार परीट, बालविकास प्रकल्प अधिकारी संदीप काळे, बालविकास प्रकल्प अधिकारी अमोल मेरगळ, जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन सपकाळ अतुल झगडे, माजी पंचायत समिती सदस्य सतीश पांढरे, सचिन धापटे आदी उपस्थित होते.

या वेळी २०२१-२२ मध्ये पोषण अभियानात उत्कृष्ट काम करणाऱ्या पर्यवेक्षिका व सेविका यांना आमदार भरणे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या वेळी प्रदर्शनाचे आणि सेल्फी पॉइंटचे आयोजन करण्यात आले होते.

‘पोषण अभियान’चा उद्देश

१ ते ३० सप्टेंबर या कालावधीत अंगणवाडी स्तरावर अभियानाच्या माध्यमातून बाळाचे आहार, आरोग्य, स्वच्छता, तसेच बाळाचे पहिल्या १ हजार दिवसांचे महत्त्व, कुपोषण निर्मूलन जनजागृती करण्याबाबत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com