पुणे : राज्याच्या थंडीत चढ-उतार (Fluctuation In Cold) होत असतानाच, गेले काही दिवस सातत्याने दाट धुक्याची चादर (Foggy Weather) अनुभवायला मिळत आहे. पूर्व विदर्भात गारठा (Cold Weather) वाढला आहे. आज (ता. ८) विदर्भाच्या काही भागात थंडीच्या लाटेचा (Cold Wave) इशारा देण्यात आला आहे. तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थंडी वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
शनिवारी (ता. ७) राज्यात अनेक ठिकाणी सकाळी धुके आणि दिवसभर ढगाळ वातावरण पहायला मिळाले. धुके आणि ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ झाली आहे.
तर पूर्व विदर्भात गारठा वाढला आहे. शनिवारी (ता. ७) गोंदिया येथे राज्यातील नीचांकी ७.०, तर नागपूर येथे ९.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
उर्वरित राज्यात किमान तापमान ११ ते २२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. राज्याच्या कमाल तापमानातही वाढ झाल्याचे दिसून आले.
एकामागोमाग येणाऱ्या पश्चिमी चक्रावतांमुळे उत्तर भारतात थंडीची लाट कमी-अधिक होत आहे. शनिवारी (ता. ७) उत्तर राजस्थानमधील चुरू येथे देशाच्या सपाट भू-भागावरील नीचांकी शून्य अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
आज (ता. ८) पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, बिहार, पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या काही भागात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. तर उत्तर भारतासह आणि ईशान्येकडील राज्यात दाट धुक्याची स्थिती राहण्याचा अंदाज आहे.
शनिवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :
पुणे २९.२ (१६.३), जळगाव २६.२ (१४.०), धुळे २६.५ (११.५), कोल्हापूर २८.५ (१८.९), महाबळेश्वर २४.६(१४.५), नाशिक २६.१ (१५.४), निफाड २७.६ (१३.५), सांगली २९.५ (२०.०), सातारा २९.१(१८.६), सोलापूर ३१.२ (१८.५), सांताक्रूझ ३३.५ (२२.०), डहाणू ३३.७ (२०.६), रत्नागिरी ३४.० (२१.०),
औरंगाबाद २६.० (१२.४), नांदेड २८.८ (१७.०), उस्मानाबाद - (१२.५), परभणी २७.२ (१५.४), अकोला २७.५ (१६.२), अमरावती २७.८ (१३.१), बुलडाणा २५.६ (१६.०), ब्रह्मपुरी २७.९ (११.४), चंद्रपूर २७.२ (१४.०), गडचिरोली २६.०(१२.०), गोंदिया २६.८(७.०), नागपूर २५.८ (९.९), वर्धा २६.०(११.८), यवतमाळ २६.० (१३.०).
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.