Jat Water Crisis : आजपर्यंत आम्हाला जिवंतपणी मारण्याचे काम केले

गेल्या पंचवीस ते तीस वर्षांत आम्हाला सोई-सुविधा, पाणी नाही दिले. आजपर्यंत राज्य शासनाने आमच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. आम्हाला जिवंतपणी मारण्याचे काम सरकार करत असल्याचा तीव्र संताप जतकरांनी व्यक्त केला.
Jat Water Crisis
Jat Water CrisisAgrowon
Published on
Updated on

सांगली : गेल्या पंचवीस ते तीस वर्षांत आम्हाला सोई-सुविधा, पाणी (Jat Water Issue) नाही दिले. आजपर्यंत राज्य शासनाने आमच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. आम्हाला जिवंतपणी मारण्याचे काम सरकार करत असल्याचा तीव्र संताप जतकरांनी व्यक्त केला. आता पाण्यासाठी लढाई होणारच, असा एल्गार दुष्काळी (Drought) भाग असलेल्या जत तालुक्यातील जनतेने केला.

Jat Water Crisis
जत पूर्व भागात फक्त पंचनामे; अजून दमडीही नाही मिळाली

जत तालुका विस्ताराने मोठा आहे. १४० गावे आहेत. तालुक्याचे नावही घेतले की डोळ्यासमोर येतो तो दुष्काळ आणि पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू असलेली जनता. या तालुक्याला म्हैशाळ योजनेचे पाणी दिले तर हा तालुका सुजलाम् सुफलाम् आणि दुष्काळमुक्त होईल, अशी इथल्या जनतेची आशा आजही आहे. २००० च्या दरम्यान, म्हैसाळ योजनेच्या सहाव्या टप्प्याला मंजुरी मिळाली.

Jat Water Crisis
Jat Border Issue : जत तालुक्यात पाणी, सीमा प्रश्न पुन्हा पेटला

तब्बल दहा वर्षांनंतर म्हणजे २०१० मध्ये जतमध्ये योजनेचे पाणी आले. परंतु वंचित गावांना पाणी मिळाले नाही. परंतु सहजासहजी म्हैसाळ योजनेचे पाणी मिळत नसल्याने तालुक्याच्या पूर्व भागातील ४२ गावांतील लोकांनी आंदोलन, उपोषणे करून पदयात्रा काढून राज्य सरकारचे लक्ष वेधले. परंतु त्याकडेही दुर्लक्ष झाले. जतच्या पूर्व भागातील ४२ गावांतील लोकांनी एकाच वेळी ग्रामपंचायतीमध्ये मासिक सभा घेऊन कर्नाटकात जाण्याचा ठराव केला.

दरम्यानच्या काळात अनेक राजकारण्यांनी योजनेचे पाणी देऊ, अशी ग्वाही दिली. २०१८ मध्ये खासदार संजय पाटील यांनी म्हैसाळ योजनेच्या अधिकाऱ्यांसमवेत विस्तारित योजनेची ब्लू प्रिंट दाखविली. संख येथील लोकसभा निवडणूक प्रचारसभेत म्हैसाळ योजनेला मान्यता दिल्याची घोषणा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली; मात्र, त्यांनी सातत्याने जनतेशी खोटे बोलून दिशाभूल केली.

गेल्या वर्षी म्हैसाळ योजनेचा सहावा टप्पा सुरू करून पाण्याची चाचणी केली. त्याचे पूजन केले. परंतु हे पाणी आमच्यामुळे आले असा श्रेयवाद सुरू झाला. पुन्हा पाणी आलेच नाही.

सोई-सुविधा पुरवण्यात राज्य सरकारचे दुर्लक्ष

केवळ पाणी पूजनासाठीचा श्रेयवाद

आंदोलन, पदयात्रा, उपोषण करूनदेखील मागणी मान्य नाही

अनेक वर्षांपासून आमची मागणी पाण्याचीच आहे. त्याचबरोबर सोई-सुविधाही नाहीत. राज्य सरकार आतापर्यंत झोपले होते का, असा प्रश्न पडत आहे.
विठ्ठल चव्हाण, विठ्ठलवाडी (उमदी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com