Onion Crop : सुक्ष्मसिंचन प्रणाली, खतांचा कार्यक्षम वापर. काटेकोर व्यवस्थापन आवश्यक

कांदा पिकाच्या उत्पादकतेत सूक्ष्मसिंचन प्रणालीचा वापर, खतांचा कार्यक्षम वापर आणि काटेकोर व्यवस्थापनातून वाढ मिळविणे शक्य आहे.
Onion Cultivation
Onion CultivationAgrowon
Published on
Updated on

Onion Production जळगाव ः ‘‘कांदा पिकाच्या उत्पादकतेत (Onion Productivity) सूक्ष्मसिंचन (Micro Irrigation) प्रणालीचा वापर, खतांचा कार्यक्षम वापर आणि काटेकोर व्यवस्थापनातून वाढ मिळविणे शक्य आहे.

त्यासाठी सातत्य असावे. यातून शाश्वत उत्पादन हाती मिळू शकते,’’ असा सूर जळगाव शहरानजीकच्या जैन हिल्स येथे आयोजित राष्ट्रीय कांदा व लसूण चर्चासत्रात उमटला.

या चर्चासत्राचा रविवारी (ता.१२) दुसरा दिवस होता. शास्त्रज्ञ, अभ्यासकांनी ‘उत्पादन तंत्रज्ञान’ या विषयावर आपले पेपर, मौखिक सादरीकरण केले.

इंडियन सोसायटी ऑफ अॅलम्स (आयएसए) (राजगुरूनगर, पुणे), राजगुरुनगर (जि. पुणे) येथील राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन केंद्र आणि जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., जळगाव यांच्यातर्फे तिसरे राष्ट्रीय चर्चासत्र आयोजिण्यात आले आहे.

रविवारच्या सत्राच्या अध्यक्षस्थानी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस. आर. गडाख होते. कांदा व लसूण संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ डॉ. ए. थंगासामी यांनी कांदा व लसूण पिकातील अन्नद्रव्य व्यवस्थापनावर पेपर सादर केला.

ते म्हणाले, ‘‘खरीप, उशिराचा खरीप व रब्बीमधील कांदा पिकास अन्नद्रव्यांची वेगवेगळ्या प्रमाणात मात्रा हवी असते.

Onion Cultivation
Onion Cultivation : यंदाही शेतकऱ्यांचा कांदा लागवडीकडेच कल

त्यासंबंधी कांदा व लसूण संशोधन केंद्राने शिफारशी केल्या आहेत. कांदा बियाणे रोपण, पुनर्लागवड आणि वाढीच्या काळात हे अन्नद्रव्य व्यवस्थापन व्हायला हवे.

पाण्यात विरघळणारी अन्नद्रव्ये व इतर माध्यमातून उपलब्ध होणारी अन्नद्रव्ये आहेत. त्यात जमिनीची स्थिती महत्त्वाची असते.’’

जैन इरिगेशन सिस्टीम्सचे कृषितज्ज्ञ डॉ. पी. सोमण म्हणाले, ‘‘सूक्ष्मसिंचनाच्या मदतीने पीक उत्पादन वाढले आहे. पाण्याची काटकसर करणेही त्यात शक्य झाले आहे. तुषार व ठिबक सिंचन कांदा पिकासाठी लाभदायी आहे.

’’ आंध्र प्रदेशातील कुर्नूल भागातील शेतकऱ्यांची केस स्टडीही त्यांनी सादर केली. ‘‘सूक्ष्मसिंचन प्रणालीची वितरण क्षमता (डिस्चार्ज) किती आहे, हेदेखील महत्त्वाचे आहे. कारण यातून किती पाणी दिले जाते, हे लक्षात येते.

त्याच्या नोंदी असायला हव्यात. कांद्याच्या १०० दिवसांच्या काळात ५०० मिलिमीटर पाणी देणे आवश्यक आहे. अतिपाण्याचा वापर टाळण्यासाठीदेखील यंत्रणा उपलब्ध आहे,’’ असेही डॉ. सोमण म्हणाले.

Onion Cultivation
Onion Chawl Project : कांदा चाळींसाठी ५१ कोटींचा निधी

ज्ञानेश्वर मदने, संदीपकुमार दत्ता, टी. एल. भुतिया, आर. लाहा, विजय महाजन, एस. एम. गावंडे, एम. एम. देशमुख, एस. आर. भोपळे, ए. डी. वराडे, बी. जे. पटले, बी. डी. जडे, ए. आर. पिंपळे, डी. एस. फाड, एस. बी. वडतकर, एन. बी. झांजड, एन. के. हिडू, गणेश चौधरी, हनुमान राम, राहुल देव, बी. एम. पांडेय, ए. पटनायक, लक्ष्मीकांत, व्ही. सुचित्रा, ए. भागवान, बी. नीरजा प्रभाकर, सईद अली, बी. के. दुबे, चंदन तिवारी, पी. के. गुप्ता, अनिता कुमारी, वीणा जोशी आदींनी मौखिक सादरीकरण केले.

‘बीजोत्पादनात बियाणे शुद्धता महत्त्वाची’

दिल्ली येथील कृषी संशोधन परिषदेतील भाजीपाला विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. भूपाल सिंह यांनी ‘कांदा बीजोत्पादनातील आव्हाने’ याबाबत पेपर सादर केला. ते म्हणाले, ‘‘कांदा बीजोत्पादनात बियाण्याची शुद्धता महत्त्वाची असते.

एकाच जातीच्या किंवा वाणाचे बीजोत्पादन घेताना दोन प्रक्षेत्रातील अंतर ७०० मीटरवर हवे. यामुळे बियाण्याची शुद्धता जोपासता येते. शुद्धता जोपासण्यासाठी वाण निवडही महत्त्वाची असते.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com