
Rehabilitation of Irshalwadi : इर्शाळवाडीच्या पुनर्वसन संदर्भातील सर्व कागदपत्रे संबंधित अधिकाऱ्यांनी पूर्ण केली आहे. सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून येत्या सहा महिन्यांत इर्शाळवाडीचे पुनर्वसन होईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली.
दुर्घटनाग्रस्त इर्शाळवाडीच्या पुनर्वसन केलेल्या तात्पुरत्या कंटेनर हाऊसमधील निवारा ठिकाणी मुख्यमंत्री शिंदे यांनी भेट दिली. अधिकारी आणि दुर्घटनाग्रस्त यांच्याबरोबर चर्चा करून पुनर्वसनाबाबत आराखडा, जागा, तेथील दळणवळण विकास यावर चर्चा करून रोजगाराबाबत तरुणांना नोकरी आणि व्यवसायाची हमी दिली.
यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, झालेली दुर्घटना दुर्दैवी होती. पण प्रशासनाने तत्परतेने पुनर्वसनाचे काम सुरू केले आहे. आम्ही आपत्ती ग्रस्ताना कोणत्याही क्षणी वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांना सर्व मदत करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ५ लाखाची आर्थीक मदत जाहीर करुन त्यांच्या तात्पुरती राहण्याची सोय करण्यात आल्याचं म्हटलं होतं. याच निवारा केंद्रांना मुख्यमंत्र्यांनी भेट दिली.
आमच्या सरकारवर कोणताही परिणाम नाही
मुख्यमंत्री बदलाबाबत विरोधकांकडून होत असलेल्या चर्चेबाबत विचारणा केली असता शिंदे म्हणाले, सरकार स्थापन झाल्यापासून ते वारंवार सरकार पडणार, मुख्यमंत्री बदलणार, अशी हेकाटी पेटत आहे.
मात्र, आमचे काम जोमाने सुरु आहे. ते बोलत राहू दे, त्यांच्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो. आमच्या सरकारवर त्याचा काहीही परिणाम होत नाही.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.