Dr. Bharat Pataknkar : धरणग्रस्तांच्या प्रश्‍नांसाठी मुख्यमंत्र्यांना वेळ नाही

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोयना धरणग्रस्त आहेत. स्वतः धरणग्रस्त असून धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी चार-चार महिने आंदोलन करावे लागते.
Dr. Bharat Patankar
Dr. Bharat PatankarAgrowon
Published on
Updated on

Solapur News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोयना धरणग्रस्त आहेत. स्वतः धरणग्रस्त असून धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी चार-चार महिने आंदोलन करावे लागते. दोन-दोन महिने बैठक लावण्यासाठी वेळ मिळत नाही. ते आपली कामे करायची सोडून भांडवलदारांची कामे करत आहेत.

शेतकरी म्हणून शिल्लक न ठेवण्याचे धोरण हे सरकार राबवताना दिसत आहे. धरणग्रस्तांचे प्रश्न किरकोळ असून सुद्धा फक्त अंमलबजावणी करण्यासाठी त्यांना वेळ मिळत नाही, अशी टीका डॉ. भारत पाटणकर यांनी केली.

श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने चिंचणी (ता. पंढरपूर) येथे उजनी, कन्हेर, कोयना धरणग्रस्तांचा निर्धार मेळावा डॉ. पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.

Dr. Bharat Patankar
Eknath shinde : पायाभूत सुविधांचे प्रकल्प वेळेत पूर्ण करा : मुख्यमंत्री शिंदे

यावेळी डॉ. पाटणकर म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील धरणग्रस्तांच्या प्रश्नाबाबत अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांच्यासोबत भ्रमणध्वनीवरून चर्चा करून तत्काळ बैठक लावून शेतीला पाटाचे पाणी मिळणे, नागरी सुविधा, अतिक्रमण, वहिवाट अडथळा, नवीन शर्त शेरा कमी करणे, स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करणे, महसूल गाव करणे अशा वेगवेगळ्या प्रश्नांबाबत धरणग्रस्तांच्या प्रतिनिधींसह लवकरच बैठक घेऊन हे प्रश्न मार्गी लावण्याचे यावेळी डॉ. पाटणकर यांनी बोलून दाखवले.

Dr. Bharat Patankar
Solapur APMC : मार्केट यार्डातील शेतमाल अडत बाजार ओस

यावेळी उपस्थित महिलांनी सुद्धा आपले विचार व्यक्त केले. या मेळाव्यासाठी वेगवेगळ्या पुनर्वसन गावांतून महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी संतोष गोटल, जगन्नाथ देशमुख, मोहन अनपट, विशाल देवकर, प्रवीण गोसावी यांनी मनोगते व्यक्त केली. शशिकांत सावंत यांनी सूत्रसंचालन केले.

आंदोलकांना गोळ्या घालण्याचे काम सुरू

धरणग्रस्तांचे प्रश्न आंदोलन न करता सुटतील, अशा स्वप्नामध्ये आता राहून चालणार नाही. दुःख व्यक्त करत करतच अश्रूंच्या ठिणग्या कराव्या लागतील, त्याशिवाय प्रश्न सुटणार नाहीत. लढाई अवघड आहे, लढणाऱ्या व आंदोलनाला बसणाऱ्या लोकांना लाठ्या-काठ्या, गोळ्या घालण्याचे धाडस सध्या सुरू आहे. लढणाऱ्याला मताचा अधिकार देऊन बाबासाहेबांनी मताची समता आणली आहे, याचं भान राज्यकर्त्यांनी ठेवावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com