Eknath Shinde : बळीराजावरचे संकट दूर कर, राज्यभर समाधानकारक पाऊस पडू दे

Bhimashankar Temple : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेवटच्या श्रावणी सोमवारी (ता.११) श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिरात ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली.
Eknath Shinde
Eknath Shinde Agrowon

Pune News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेवटच्या श्रावणी सोमवारी (ता.११) श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिरात ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. या वेळी ‘‘बळीराजावरचे संकट दूर कर, राज्यभर समाधानकारक पाऊस पडू दे.

राज्यावरचे संकट दूर होऊन राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे; राज्यातील सर्व घटकांना सुख, समाधान आणि आनंद मिळू दे,’’ अशी प्रार्थना भगवान भीमाशंकराकडे केली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पूजेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भीमाशंकर देवस्थान ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलिस अधीक्षक अंकित गोयल, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे आदी उपस्थित होते.

Eknath Shinde
Eknath Shinde : ‘...सहा महिने थांब’ संकल्पना मोडीत काढली : एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, ‘‘भाविक श्रद्धेने आणि भक्तिभावाने येथे दर्शनाला येत असतात. मी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्रावण सोमवारी दर्शनासाठी आलो आहे. येथे लाखो भक्त येत असल्याने शासनाने १४८ कोटींचा विकास आराखडा तयार केला आहे. आतापर्यंत त्यातील ६८ कोटी रुपयांचा निधी विविध सुविधांवर खर्च करण्यात आला आहे.

Eknath Shinde
Eknath shinde : पायाभूत सुविधांचे प्रकल्प वेळेत पूर्ण करा : मुख्यमंत्री शिंदे

येथे येणाऱ्या भाविकांची कुठलीही गैरसोय होणार नाही अशा सर्व मूलभूत सुविधा शासनाच्या माध्यमातून दिल्या जातील. परिसरात स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि स्नानगृहाची व्यवस्था करण्याचे तसेच परिसरातील आदिवासी पाड्यात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत,’’ असेही ते म्हणाले.

या प्रसंगी जुन्नर आंबेगावचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, खेड उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे, तहसीलदार तथा देवस्थानचे कार्यकारी विश्वस्त संजय नागटिळक, श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष ॲड. सुरेश कौदरे, विश्वस्त मधुकर गवांदे, दत्तात्रय कौदरे, रत्नाकर कोडीलकर आदी उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com