Nagar News : चंद्रशेखर घुले यांचे राजकीय सक्रियतेचे संकेत

माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी गेल्या अनेक दिवसांपासून तालुक्याच्या राजकारणातून स्वतःला दूर ठेवले असल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
Chnadrashekhar Ghule
Chnadrashekhar GhuleAgrowon

नगर ः ‘‘भाऊ, तुम्ही आता सक्रिय व्हा, नाही तर तालुक्यात राष्ट्रवादीचे (NCP) घड्याळ बंद पडलेले दिसेल,’’ अशा शब्दांत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी माजी आमदार चंद्रशेखर घुले (Chandrashekhar Ghule) यांना साकडे घालत पुन्हा एकदा तालुक्याच्या राजकारणात सक्रिय होण्याचे आवाहन केले.

तालुक्यातील चितळी येथे झालेल्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या. घुले यांनाही कार्यकर्त्यांच्या भावनेला दाद दिल्याने त्यामुळे शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील राजकारण पुन्हा ढवळून निघणार हे स्पष्ट झाले आहे.

Chnadrashekhar Ghule
Maharashtra politics : सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीने काँग्रेसची कोंडी

नगर जिल्ह्यातील पाथर्डी-शेवगाव विधानसभा मतदार संघाचे काही काळ नेतृत्व केलेले माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी गेल्या अनेक दिवसांपासून तालुक्याच्या राजकारणातून स्वतःला दूर ठेवले असल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर आज अनेक वक्त्यांनी घुले यांनी सक्रिय व्हावे, असा सूर आळवला. घुले यांनीसुद्धा पुन्हा सक्रिय होण्याचे संकेत दिले. पाथर्डी तालुक्यातील चितळी येथे नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी ही भावना व्यक्त केली. पाथर्डी तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Chnadrashekhar Ghule
NCP Convention : समविचारी पक्षांनी एकत्र यावे ः ‘राष्ट्रवादी’ची हाक

‘‘तुम्ही तालुक्याकडे पाठ फिरवल्याने कोणत्याही कार्यक्रमात आता बोर्डवर घड्याळाचे चिन्ह दिसत नाही. कार्यकर्त्यांना जिवंत ठेवायचे की नाही, हे आता तुम्ही ठरवा. आम्हाला कोणी वाली राहिला नाही. आमचे हातपाय गळाले आहेत.

कोणाच्या भरवशावर आता निवडणुका लढवायच्या, असा प्रश्न निर्माण झाला असल्याने, तुम्ही सक्रिय व्हा,’’ असे आवाहन केले. चंद्रशेखर घुले यांनाही कार्यकर्त्यांच्या भावनेला दाद दिली.

‘‘माझ्या आमदारकीच्या काळात अनेक विकासकामे तालुक्यात केली. मी येत नसलो, तरी फोनवरून सर्वांशी संपर्क असतो.

क्षितिज घुले हे मात्र तुमच्या संपर्कात आहेत. जी आपली नाळ जुळली आहे, ती तुटू देऊ नका. लवकरच तालुक्यात येऊन तुमच्याशी संवाद करेन,’’ असे यावेळी चंद्रशेखर घुले यांनी स्पष्ट केले.

गेल्या दहा वर्षांपासून चंद्रशेखर घुले निवडणुकीपासून दूर आहेत. सध्या दहा वर्षापासून हा मतदार संघ भाजपच्या ताब्यात असून मोनिका राजळे येथे आमदार आहेत. आता शेवगाव- पाथर्डी मतदार संघातील राजकारणही ढवळून निघणार हे स्पष्ट झाले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com